सध्या अवघ्या जगाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू वेठीसच धरले आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणानुसार त्यांनी भारतासह जगातील प्रमुख देशांच्या उत्पादनावर आयात शुल्क (टेरिफ) वाढविले आहे. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. शेअर बाजार कोसळून अब्जावधींचे नुकसान झाले आहे. अमेरिकेतील नागरिकांतही असंतोष पसरू लागला आहे. तेथेही रस्त्यावर उतरून नागरिक उत्स्फूर्त आंदोलने करत आहेत. त्याविषयी...
सूर्य उगवला, प्रकाश पडला,
आडवा ‘डोनाल्ड’;
जगाला आडवा ‘डोनाल्ड’
त्याला साष्टांग नमस्कार
आडवा ‘डोनाल्ड’,
त्याला साष्टांग नमस्कार
अगं, गं, गं, गं, गं, गं, गं, गंऽऽऽ
अगं, गं, गं, गंऽ
‘तात्या’ विंचू चावला
आता जग काय करणारऽऽऽ
‘तात्या’ विंचू चावला
आता कुणाला सांगणाऽऽऽ
‘तात्या’ विंचू चावला
आता बया बयाऽऽऽ ‘तात्या’ विंचू चावला
अरे देवा देवा देवाऽऽऽ ‘तात्या’ विंचू चावला
‘तात्या’ विंचू चावला विंचू चावला, विंचू चावला, होऽऽऽ
महाराज, महाराज महाराज असं काय झालं एकाएकी?
अमेरिकेचा ‘तात्या’ विंचू चावलाऽऽऽ
अवघ्या जगालाच घाम आला
त्याने अर्थव्यवस्थेचा प्राण चालला
बाबाओ ‘तात्या’ विंचू चावलाऽऽऽ
महाराज ‘तात्या’ विंचू चावलाऽऽऽ
महाराज अगं, गं, गं, गं, गं, गं, गं, गंऽऽऽ
अगं, गं, गं, गंऽऽऽ ‘तात्या’ विंचू चावला
ट्र्म्प इंगळी अति दारूण अति दारूनं म्हंजीऽऽऽ?
ए ए ए...दारूनं नव्हं दारूणऽऽऽ
दारूण म्हणजे काय?
दारूण म्हणजे भयंकर
अन भयंकर म्हंजी काय?
अतिऽऽऽ भयंकर अन अतिऽऽऽ भयंकर म्हंजी काय?
मायंदाळ भयंकरऽऽऽ
अन मायंदाळ भयंकरऽऽऽ म्हंजी काय?
अवघ्या जगाचे शेअर बाजार कोसळल्यानं
नुकसानीनं जो तरास होईल तितका भयंकर
बापरे !
ही इंगळी अति दारूण
मज नांगी मारिली तिनं तिनं म्हणजे कुणी ?
त्या चीनच्या जिनपिंगनं? जिनपिंगचा
इथे कायऽऽऽ संबंध ? मग त्या रशियाच्या पुतिननं?
त्यानं न्हायऽऽऽ त्या ट्रम्प इंगळीनं
महाराज ट्रम्प इंगळी म्हंजी काय ?
ट्रम्प इंगळी म्हणजे मोठाऽऽऽ‘तात्या’ विंचू !
मोठाऽऽऽ तरी किती मोठा ?
अरे तुझ्याऽऽऽएवढा ! ट्रम्प इंगळी
अति दारूण जगाला नांगी मारिली
तिनं अवघ्या जगास वेदना त्याऽऽऽ
इंगळीची अन् त्यानं चालवली ‘मस्क’री या दुनियेची
अगं, गं, गं, गंं ‘तात्या’ विंचू चावला
देवा रे देवा, ‘तात्या’ विंचू चावला...
आता जग काय करणार ‘तात्या’ विंचू चावला
अरे‘तात्या’ विंचू चावला रे
‘तात्या’ विंचू चावला, रे ‘तात्या’ विंचू चावला हो
या विंचवाला एकच उतारा, याचे तमोगुण मागे सारा
आता महाराज तुम्हाला तमोगुण म्हंजी माहिती आहे का?
तमोगुण म्हंजी तंबाखू अन चुना एकत्र खाऊन
मंगऽऽऽ ए ए ए तमोगुण म्हणजे काय?
तमोगुण म्हणजे काय?
गर्वाने जर तात्याच्या छातीचा फुगा फुगला असेल तर
पिन लावून थोडी हवा कमी करा
अन् त्या ‘मस्क’ला बाजूला सारा
अगं, गं, गं, गं, गं ‘तात्या’ विंचू चावला देवा रे देवा,
‘तात्या’ विंचू चावला... आता जग काय करणार
‘तात्या’ विंचू चावला
याला दुप्पट ‘टेरिफ’चा लावा अंगारा
अन् मग तात्या विंचू उतरे झराझरा
‘टेरिफ’चा अंगारा म्हंजे हो काय?
त्याच्या ‘टेरिफ’च्या दंशावर उतारा
दुप्पट ‘टेरिफ’नेच उतरेल त्याचा तोरा...
गर्वाचे घर खाली करा
ही दादागिरी बंद करा
त्यासाठी रस्त्यावर उतरा
अमेरिकन करती शब्द खरा
अवघे जग बाह्या सावरून
उभे राहिले छाती काढून ‘जशास तसे’ मंत्र आळवून
पर्याय काढितसे शोधून
अगं, गं, गं, गं, गं ‘तात्या’ विंचू चावला देवा रे देवा,
‘तात्या’ विंचू चावला...
निर्यातीला शोधून अन्य बाजार अमेरिकेला करू आता बेजार
मग सत्य उतारा येऊन अवघा
सारिल तमोगुण किंचित राहिली जरी फुणफुण,
शांत करेल जनता जनार्दन...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.