Chandrayaan-3 : दक्षिण आफ्रिकेच्या वर्तमानपत्रात मोदींचे कौतुक ; एस जयशंकर यांचे टि्वट

PM Modi News : दक्षिण आफ्रिकेच्या एका वृत्तपत्रात ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3)च्या यशस्वी लँडिंगचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
Chandrayaan-3
Chandrayaan-3 Sarkarnama

New Delhi : भारताच्या ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3) ने बुधवारी चंद्रावर यशस्वी लँडिंग करीत इतिहास रचला.भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या यशावर देश-परदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

BRICS Summit साठी दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या पंतप्रधानांनाही अनेक देशांच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एका वृत्तपत्रात ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3)च्या यशस्वी लँडिंगचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

हे वृत्त नरेंद्र मोदी वाचत असल्याचा फोटो एस जयशंकर यांनी शेअर केला आहे. 'India's Modi Out Of This World'अशी या वृत्तपत्राची हेडलाईन आहे. या फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

काल (बुधवारी) देशातील भारतीयांसाठी जसा हा क्षण सोहळ्याचा आणि अभिमानाचा होता तसाच तो परदेशात राहणार्‍या भारतीयांसाठी देखील होता आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध Times Square जवळ अनेक अमेरिकेत स्थित असलेले भारतीय एकत्र जमले होते. त्यांनी तिरंगा फडकवत भारताचं यश सेलिब्रेट केलं आहे.

Chandrayaan-3
Sanjay raut News : "याद राखा, आमचेच सरकार येईल, कारवायांची किंमत मोजावी लागेल” ; राऊतांची तपास यंत्रणांनाच दमबाजी

इस्रोच्या (ISRO) यूट्यूबवरील (YouTube) लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकनेही इतिहास रचला आहे. ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी 8.06 दशलक्ष लोकांनी पाहिले आणि यूट्यूब इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com