पंजाबमध्ये पाकिस्तानच्या ड्रोनमधून कुरापती ; बीएसएफ जवानांचे चोख उत्तर

बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन भारत-पाक सीमेवर उडताना दिसला. त्यानंतर सुरक्षेत तैनात बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला.
 bsf punjab
bsf punjabsarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली: पंजाबमध्ये २० तारखेला विधानसभेची (Punjab Assembly)निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान पंजाबमधील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण पाकिस्थानचा हा डाव बीएसएफच्या (bsf)जवानांनी उधळून लावला आहे.

निवडणुकी दरम्यान पाकिस्तानने कुरापती करण्यास सुरवात केली आहे. पण त्यांचा हा डाव बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच, 15 जानेवारी रोजी भारत-पाक सीमेच्या 2 किलोमीटर आधी 5 किलो स्फोटक वस्तु जप्त करण्यात आल्या होत्या.

काल (मंगळवारी) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या पंजग्राहियन बीओपीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन भारत-पाक सीमेवर उडताना दिसला. त्यानंतर सुरक्षेत तैनात बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काही स्फोटक वस्तू फेकण्यात आल्याचे समजते. दोन ठिकाणी स्फोटके सापडली आहेत. बीएसएफच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये 73 बटालियनच्या जवानांना अजनाला तहसीलमधील पंजग्राहियन सीमा चौकीवर ड्रोन दिसले

 bsf punjab
शेतकऱ्याच्या मुलींनी अडवली धनंजय मुंडेंची गाडी ; म्हणाल्या, 'न्याय द्या'

''बीएसएफ जवानांनी सीमेवर उडणाऱ्या ड्रोनवर गोळीबार केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काही वस्तू फेकल्याचा संशय असून, दोन ठिकाणी स्फोटके सापडली आहेत. मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानातून स्फोटक पदार्थ, शस्त्रे आणि हेरॉईन सोडले जाण्याची भीती आहे,'' अशी माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com