DU Syllabus : हे पहिल्यादांच घडतयं ; सावरकरांनी महात्मा गांधींना मागे टाकलं, सावरकरांचे हिंदुत्व आता अभ्यासक्रमात..

Savarakar included IN DU Syllabus : महात्मा गांधींचा समावेश अभ्यासक्रमात सातव्या सत्रात आहे
Savarakar included IN DU Syllabus
Savarakar included IN DU Syllabus Sarkarnama
Published on
Updated on

Savarakar included IN DU Syllabus : दिल्ली विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात येत आहे. बीए राज्यशास्त्रात काही बदल करण्यात आला आहे.

या पाठ्यपुस्तकात आता प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्त, विज्ञाननिष्ठ वीर सावरकर यांच्याविषयीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पहिल्यादांच वीर सावरकरांचा समावेश करण्यात आला आहे.

याबाबत दिल्ली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आलोक रंजन म्हणाले, "यापूर्वी सावरकरांचा अभ्यासक्रमात समावेश नव्हता. पण महात्मा गांधी यांच्याविषयीचा अभ्यासक्रम आहे.

नवीन बदलामध्ये आता महात्मा गांधी यांच्यापूर्वी सावरकरांचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. महात्मा गांधींचा समावेश अभ्यासक्रमात सातव्या सत्रात आहे, तर सावरकरांचा समावेश पाचव्या सत्रात करण्यात आला आहे.

"सावरकरांचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यास आम्हाला कुठलीही अडचण नव्हती, पण हा अभ्यासक्रम गांधींच्या अभ्यासक्रमापूर्वी शिकवला गेला पाहिजे," असे आलोक रंजन म्हणाले.

Savarakar included IN DU Syllabus
DU Political Science: ‘सारे जहाँ से अच्छा…’ लिहिणारे इक्बाल अभ्यासक्रमाबाहेर ; सावित्रीबाई फुलेंचा समावेश..

दिल्ली विद्यापीठाने कवी मोहम्मद इक्बाल यांना अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. इक्बाल यांच्यावरील पाठ बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवला जात आहे. त्या ऐवजी आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयीच्या पाठाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

Savarakar included IN DU Syllabus
New Parliament Building : नव्या वादाला तोंड फुटलं ; संसद भवन नव्हे ही तर शवपेटी..

त्यामुळे दिल्ली विद्यापीठात आता 'सारे जहाँ से अच्छा'लिहिणाऱ्या इक्बाल यांच्यावरील पाठ अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहे.दिल्ली विद्यापीठाची अधिसभा नुकतीच झाली. यात विद्यापीठाचे कुलगुरु दिनेश सिंह यांनी ही माहिती दिली.

इक्बाल यांनी मुस्लिम लीग आणि पाकिस्तान आंदोलनाच्या समर्थनार्थ गाणी लिहिली आहेत. भारताचे विभाजन आणि पाकिस्तान स्थापनेचा विचार सगळ्यात अगोदर इक्बाल यांनी मांडला होता.

अशा व्यक्तींच्या चरित्राबाबत शिकवण्यापेक्षा देशातील आदर्श व्यक्तीबाबतच्या माहितीचा समावेश करण्यात येणार आहे, असे कुलगुरु दिनेश सिंह यांनी सांगितले. नऊ जून रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com