LPG Gas Price : दसरा-दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिकांना झटका; गॅस सिलिंडर तब्बल दोनशे रुपयांनी महागला!

Commercial LPG Gas Cylinder price Hikes : दसरा, नवरात्री आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई आणखी किती वाढणार ?
Commercial Gas Cylinder price Hikes :
Commercial Gas Cylinder price Hikes :Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ होणार असल्याने देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा झटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा आणि नवरात्र असे मोठे सण साजरे होणार आहेत. अशा वेळी महिन्याच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिकांना तेल कंपन्यांनी जोर का झटका दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २०९ रुपयांची दर वाढ करण्यात आली आहे. आजपासून (१ ऑक्टोबर २०२३) ही दरवाढ लागू झाली आहे. (Latest Marathi News)

राजधानी मुंबईत १९ किलो व्यावसायिक सिलिंडरचा दर हा १ हजार ६८४ रुपयांवर गेला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरवर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या नव्या दरवाढीप्रमाणे नवी दिल्लीमध्ये १९ किलो गॅस सिलिंडरचे दर १७३१.५०, कोलकाता १८३९.५० रुपये, तर मुंबईत १६८४ रुपयांना नवे सिलिंडर मिळणार आहे.

ऑक्‍टोबर महिन्यात मोठ्या सण-उत्सवाच्या काळात सिलिंडर महागल्याने, महागाई वाढण्याची शक्यता आहे. याचा भुर्दंड सामान्यांवर पडणार आहे. तेल कंपन्यांनी एकाएकी व्यावसायिक सिलिंडर गॅसमध्ये दरवाढ केली आहे. आजपासून ही दरवाढ केल्याने दसरा, नवरात्री आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई आणखी किती वाढणार, असा सवाल सामान्यांकडून विचारला जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com