ED Action News : मद्य घोटाळ्यात केजरीवालानंतर मंत्री गेहलोतांवर ईडीचा फेरा; पाच तास कसून चौकशी...

Ed Action On Kejriwal News : चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या कैलाश गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ED Action News
ED Action NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्लीच्या कथित दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज शनिवारी (दि. 30 मार्च) केजरीवाल सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांची चौकशी केली. ईडीच्या दुसऱ्या समन्सवर दिल्ली सरकारचे मंत्री आज सकाळी 11.30 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचले, तेथे त्यांची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या कैलाश गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. (Latest Marathi News)

विजय नायर यांच्याबाबत माहिती नव्हती -

कैलाश गेहलोत म्हणाले, मी वसंत कुंज येथील एका खाजगी घरात राहतो. डीपीएस शाळा आमच्या घराच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे माझी पत्नी आणि मुलांनी तेथून शिफ्ट होण्यास नकार दिला. त्यामुळे विजय नायर तेथे राहतो की नाही, याची माहिती माझ्याकडून घेण्यात आली. मला याबाबत कोणतीही माहिती नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईडीने तुम्हाला समन्स का पाठवले?

कैलाश गेहलोत म्हणाले, "विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान एक महिन्यापूर्वी मला पहिले समन्स आले होते. विधानसभेचे (Assembly) अधिवेशन सुरू आहे, मला थोडा वेळ द्या, असे सांगत मी वेळ मागितला होता. कारण मंत्री म्हणून अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. ईडीने मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक आयोजित केली नाही." कैलाश गेहलोत हे उत्पादन शुल्क धोरणाचा मसुदा तयार करणाऱ्या मंत्र्यांच्या गटाचा एक भाग होते. यामुळे ईडीने त्यांना समन्स बजावले होते.

गोव्याला निवडणूक प्रचाराबाबत काहीच माहिती नाही -

कैलाश गेहलोत म्हणाले की, मी गोवा निवडणूक प्रचाराचा भाग नव्हतो. दारू घोटाळ्यातील कथित गुन्हेगारीतील पैसे गोवा निवडणूक वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रश्नावर कैलाश गेहलोत म्हणाले, मी यावर भाष्य करू शकत नाही. कारण मी गोवा निवडणूक (Election) प्रचाराच्या नियोजनाचा भाग कधीच नव्हतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com