National Herald case : मोठी बातमी ! नॅशनल हेरॉल्डच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्डच्या दिल्ली आणि इतर ठिकाणी असलेल्या (National Herald) कार्यालयावर छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. ईडीचे (ED) अधिकाऱ्यांकडून नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात शोधमोहीम सुरु आहे. या प्रकरणी गेल्या आढ-दहा दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही चौकशाही सुरु आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहेत.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊसवर छापेमारी सुरु केली आहे. या प्रकरणी काही दस्तऐवज शोधण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांनी नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी करत आहेत. याच दरम्यान सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर झालेल्या बैठकीची कागदपत्रेही तपासली जात आहेत.
ईडीने 27 जुलै रोजी सोनिया गांधी यांची सुमारे तब्बल अकरा तास चौकशी केली. जवळपास तीन दिवस ही चौकशी चालली. यादरम्यान ईडीने सोनिया गांधी यांना हेराल्डशी संबंधित चाळीसपेक्षा अधिक प्रश्न विचारले. तर सोनियां गांधी यांच्या आधी ईडीने राहुल गांधींचीही पन्नास तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली आहे.
काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता.
२०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते.
२००८ मध्ये एजेएलची सगळी प्रकाशनं बंद केली. या कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झालं होतं.
काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी स्थापन केली.
सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोडा हे कंपनीत संचालक होते.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे ७६ टक्के शेअर्स होते.
काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९० कोटींचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहण केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.