हरियाणातील नेत्याने आपला पक्ष केला राष्ट्रवादीत विलीन!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्या सोनिया दुहन यांनी वर्मा यांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला
Delhi NCP
Delhi NCPSarkarnama

नवी दिल्ली : हरियाणामधील (Haryana) मराठा वीरेंद्र वर्मा यांनी आपली ‘एकता शक्ती पार्टी’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) विलीन केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत (Delhi) पक्षाच्या मुख्यालयात वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांनी वर्मा यांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. (Ekta Shakti Party in Haryana merged with Nationalist Congress Party)

हरियानाच्या राजकारणात विशेषतः कर्नाल जिल्ह्यात मराठा वीरेंद्र वर्मा हे चर्चेत असणारे राजकीय नेते आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारेवर प्रभावित होऊन वर्मा यांनी आपली एकता शक्ती पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केली आहे. ही पार्टी आणि वर्मा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी सोनिया दुहन यांनी डावपेच आखले होते. वीरेंद्र वर्मा यांच्या प्रवेशामुळे हरियाणा राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली आहे, असा दावा या वेळी उपस्थित वक्त्यांनी केला.

Delhi NCP
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा देणार उद्धव ठाकरेंना धक्का

या वेळी शरद पवार म्हणाले की, हरियाणातील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष मराठा वीरेंद्र वर्मा आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. वर्मा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही आनंदात आहोत. हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात वर्मा हे येतात. संपूर्ण देशाची धान्याचा प्रश्न सोडविण्याची ताकद एकट्या कर्नाल जिल्ह्याची आहे. पण, तेथील शेतकऱ्यांना आपल्या धान्याची योग्य किंमत मिळत नाही, असा आरोपही पवार यांनी या वेळी बोलताना केला.

Delhi NCP
काँग्रेस नेते अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास गुफ्तगू

वीरेंद्र वर्मा यांच्या साथीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लढा देईल. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया हरियाणात आम्हाला मजबूत करायचा आहे. हरियाणातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आम्ही लक्ष देऊ, असेही पवार यांनी शेवटी सांगितले.

Delhi NCP
महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन माजी मंत्री शिंदे सरकारमध्ये पुन्हा होणार मंत्री

या वेळी केरळचे वनमंत्री आणि पक्षाचे नेते ए. के. शशीधरन, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव टी. पी. पितांबरम, दिल्लीचे अध्यक्ष योगानंद शास्त्री, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com