
बंगळूर : विधान परिषदेच्या निवडणुकीची (Legislative Council Election) धामधूम संपली असली तरी आता निकालाचा तिढा निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या मतमोजणीला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावरून निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसचे (Congress) सर्वांत श्रीमंत उमेदवार युसूफ शरीफ (Yusuf Sharif) हे उच्च न्यायालयात गेल्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.
बंगळूर शहर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 15 स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या हक्काला युसूफ शरीफ यांच्यासह इतरांनी हरकत घेतली होती. यासाठी ते उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी तात्पुरता स्थगिती आदेश दिला असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाशिवाय निकाल जाहीर करण्यास मनाई केली आहे. या विरोधात निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विधान परिषदेचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होणार असून, 13 डिसेंबरला यावर न्यायालय निकाल देणार आहे.
बोम्मासंद्रा, अट्टिबेले आणि अनेकल या नगरपालिकांच्या 15 स्वीकृत सदस्यांचे मत गृहित धरू नये, अशी शरीफ यांनी मागणी केली होती. कारण त्यांना नगरपालिकांमध्ये मतदानाचा अधिकार नसतो, असे त्यांनी म्हटले आहे. आता या सदस्यांच्या मतदानाच्या हक्काबाबत उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्टता येणार आहे.
काँग्रेसने युसूफ शरीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरीफ हे राज्यातील सर्वांत श्रीमंत राजकारणी मानले जात आहेत. शरीफ हे अब्जाधीश आहेत. ते सुरवातीला भंगार व्यावसायिक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आता त्यांची संपत्ती जाहीर केली असून, त्यांची एकूण मालमत्ता 1 हजार 744 कोटी रुपये आहे. शरीफ हे भंगारवाले या नावाने परिचित आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षीय वर्तुळात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.
शरीफ हे मूळचे कोलार गोल्ड फिल्ड्स येथील आहेत. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून, ते सरकारी शाळेत झाले आहे. त्यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत. त्यात एक मुलगी आणि पाच मुलांचा समावेश आहे. शरीफ यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या मोटारी आहेत. यात एक रोल्स रॉईस आणि दोन फॉर्च्युनर मोटारींचा समावेश आहे. अब्जाधीश उमेदवाराला काँग्रेसने अचानक विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.