Election Commission On Exit polls : 'एक्झिट पोल्स' अन् मीडियाच्या अतिउतावीळपणावर निवडणूक आयोगाने ठेवलं बोट!

Chief Election Commissioner Rajeev Kumar on Exit Polls Results : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारपरिषदेतच काय सुनावलं आहे.
Rajeev Kumar
Rajeev KumarSarkarnama
Published on
Updated on

Election Commission Press : निवडणूक आयोगाने आज(मंगळवार) पत्रकारपरिषद घेत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. याशिवाय, 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहेत. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेनंतर राजीव कुमार(Rajeev Kumar) यांनी मीडियाच्या काही प्रश्नांना उत्तर दिलं. याशिवाय एक्झिट पोल्स आणि निकालाबाबत मीडियाकडून जो अतिउतावीळपणा केला जातो, त्यावरही त्यांनी बोट ठेवलं. तसेच कुठंतरी सेल्फ करेक्शनची आवश्यकता असल्याचही बोलून दाखवलं.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पत्रकारपरिषदेत म्हणाले, 'ज्या दिवशी मतदान झाले, त्याच्या साधारण तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते. तर आज सायंकाळी सहा वाजेपासून एक अंदाज वर्तवला जातो. सर्वांनी विचार केला हे होणार आहे. ज्याला काही शास्त्रीय आधार, जो काही जाहीर प्रकटीकरणात नाही. जेव्हा मतमोजणी सुरू होते, तर 8 वाजून 05 मिनिटांनी आणि 10 मिनिटांनी निकाल येणं सुरू होतात, हा मूर्खपणा आहे.'

Rajeev Kumar
Election Commission on Rashmi Shukla : रश्मी शुक्लांबाबत काँग्रेसच्या 'त्या' मागणीवर अखेर निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका!

तसेच राजीव कुमार पुढे म्हणाले, 'तुम्हीच सांगा, माझी पहिली मतमोजणी ही साडेआठ वाजता सुरू होते. आमच्याकडे यावेळी प्रमाण आहे, की 8.05, 8.10, 8.15 वाजेपासूनच दाखवलं जावू लागलं, की एवढं मताधिक्क्य आणि इतक्या मतांनी हा उमेदवार मागे वैगेरे. मी केवळ प्रश्न उपस्थित करतोय, आम्हाला याच्या खोलात जायचं नाही. पण असं तर नाही ना की एक्झिट पोलला खरं ठरवण्यासाठी ते सुरुवातीस कल दाखवले गेले? की आम्ही तर जसं म्हटलं होतं तसेच ट्रेंड समोर येत आहेत. नंतर जे होईल ते होईल.'

'मग अचानक पहिला निकाल एका फेरीचा, साडेआठ वाजता जर मतमोजणी सुरू होत असेल, ९ वाजण्यास पाच मिनिटं, दहा मिनिटं किंवा त्या अगोदर म्हणजे एका फेरीसाठी किमान २० मिनिटं तरी लागतात त्यापूर्वी येऊच शकत नाही आणि आम्ही तो निकाल साडेनऊ वाजता वेबसाईटवर टाकतो. 9 वाजून 31 मिनिटांनी बरोबर. तुम्ही कधीही बघा. 9 वाजून 30 मिनिटांनी आम्ही तो आमच्या वेबसाईटवर टाकतो. त्यानंतर साडेअकरा वाजता टाकला जातो आणि मग 1 वाजून 30 मिनिटांनी टाकतो.' अशी माहिती त्यांनी दिली.

Rajeev Kumar
Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचा शंखनाद, 20 नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी लागणार 'युती की आघाडी'चा निकाल

याचबरोबर 'चला ठीक आहे, तुमचा कोणी प्रतिनिधी तिथे उपस्थित होता आणि त्यांनी आधीच सांगितलं, असं मानूया. मतमोजणीच्या निकालास स्क्रीनवर दाखवावं लागतं. प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या लागतात, निरीक्षकांकडून पडताळणी करून घ्यावी लागते, तर अधिकृत साईटवर येण्यास अर्धातास लागू शकतो. परंतु 9 पासून ते 9 वाजण्यास 10 मिनिटे आधी कसं येऊ शकतो? आणि यामुळे काय होतं, एक अपेक्षा आहे एक्झिट पोल्सची, त्यानंतर पावणनऊ वाजता मी दाखवलं आणि त्याच मापदंडाचे आधारे की ते उमेदवार आघाडीवर आहेत.

त्यानंतर मग जेव्हा प्रत्यक्ष निकाल बाहेर येण्यास सुरुवात होते, तेव्हा तो पूर्णपणे विपरीत असतो आणि हा विरोधाभास कधीकधी गंभीर मुद्दा निर्माण करतो. अशावेळी अपेक्षा आणि साध्य यांच्यातील अंतर हे काही नसून केवळ निराशा असते.' असंही राजीव कुमार यांनी बोलून दाखवलं.

याशिवाय 'हा विषय असा आहे, ज्यावर आम्ही तर नाही आमचे तर हात बांधलेले आहेत. परंतु काही ना काही मंथन करण्याची आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे, जेव्हा जेव्हा या देशात अशाप्रकारची गरज भासते, तेव्हा एक स्वयंसुधारणा होते. तर सर्व जबाबदार व्यक्ती याबाबत स्वयंदुरुस्ती नक्कीच करतील आणि मला याबाबत खात्री आहे.' अशा शब्दांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी टिप्पणी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com