वाजपेयी, गांधी यांच्या विरोधात लढणारी व्यक्ती राज्यसभेच्या रिंगणात ; ही २३० वी निवडणूक

१९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांचा हा 'राजकीय प्रवास' सुरुच आहे.
K Padmarajan
K Padmarajansarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : येत्या १० जून रोजी १५ राज्यातील राज्यसभेच्या ५७ जांगासाठी निवडणूक होत आहे, या निवडणुकीत एका व्यक्तीने तामिळनाडू (tamilnadu) मधून अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही त्यांनी पंचायत समितीपासून ते राष्ट्रपतीपदासाठी अशा अनेक निवडणुका लढविल्या आहेत.

आज त्यांनी राज्यसभेसाठी (rajya sabha election) अर्ज दाखल केला आहे. ही त्यांची २३० वी निवडणूक आहे. एकाही निवडणूक ते विजयी झाले नसले तरी अनेक निवडणुका लढण्याचा 'बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड' त्यांच्या नावावर आहे. 'ऑल इंडिया इलेक्शन किंग,'म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आहे. पराभव झाल्यानंतरही ते निवडणुक लढवित असतात. "सर्वसामान्य व्यक्तीही निवडणुक लढवू शकते, याबाबत समाजात जनजागृती व्हावी,यासाठी मी निवडणूक लढत असतो," असे त्यांनी सांगितले. के पद्मराजन (K Padmarajan) असे या व्यक्तीचं नाव आहे.

K Padmarajan
MNS : 'मला डावललं जातयं' म्हणणाऱ्या वसंत मोरेंची नाराजी दूर होईल का?

निवडणुका आल्या की 'ऑल इंडिया इलेक्शन किंग' अर्थात के पद्मराजन यांच्या नावाची चर्चा होते. ६३ वर्षीय के पद्मराजन हे तामिळनाडूतील मेट्टुर (जि.सलेम) येथील रहिवाशी आहेत. ते व्यवसायानं होमोपॅथी डॅाक्टर आहेत.

१९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांचा हा 'राजकीय प्रवास' सुरुच आहे. पंचायत समिती ते राष्ट्रपतीपदासाठी त्यांनी निवडणुका लढविला आहेत.आतापर्यंत त्यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च केले आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्याविरोधातही निवडणुक लढविली आहे. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी वायनाड येथून राहुल गांधी यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या आखाड्यात होते. या निवडणुकीत कुठलाही प्रचार न करता त्यांना १८५० मते मिळाली होती. अटल बिहारी वाजपेयी, नरसिंह राव, जयललिता, करुणानिधि, एके एंटनी, एसएम कृष्णा, एमके स्टालिन यांच्याविरोधात के पद्मराजन यांनी निवडणूक लढविली आहे.

K Padmarajan
BREAKING : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

के पद्मराजन यांनी लढविलेल्या काही निवडणुका

राष्ट्रपतीपदासाठी (पाच वेळा)

लोकसभा (३२ वेळा)

राज्यसभा (५० वेळा)

विधानसभा (७२)

विधानपरिषद (३)

नगराध्यक्ष (१)

पंचायत समिती अध्यक्ष (४)

ग्रामपंचायत (१२)

जिल्हा परिषद सदस्य (२)

नगरसेवक (६)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com