BJP VS Congress: भाजपचा 'कॉन्फिडन्स' दसपटीने वाढला; तब्बल 'एवढ्या' राज्यात असणार सत्ता तर काँग्रेसचं काय ?

Election Result : या राज्याच्या निवडणुकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जाते.
Pm Modi and Rahul Gandhi
Pm Modi and Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशातील छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने तीन राज्यात बहुमत मिळवले. तर काँग्रेसने एका राज्यात बाजी मारली.

आता सोमवारी मिझोरमचा निकाल जाहीर होणार आहे. पण या पाचही राज्याच्या निवडणुकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जाते. या सेमीफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली तर काँग्रेसला मोठा धक्का बसला. तीन राज्यातील निकालामुळे भाजपचा 'कॉन्फिडन्स' हा दसपटीने वाढला आहे.

राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसच्या हातातून गेली, तर फक्त तेलंगणात काँग्रेसला विजय मिळवता आला. मध्य प्रदेशातील सत्ता राखण्यात भाजपला यश आलं. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही राज्य महत्वाची ठरणार आहेत. सध्या देशात भाजप (BJP) क्रमांक एकचा पक्ष असून भाजपची जवळपास 12 राज्यात सत्ता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pm Modi and Rahul Gandhi
Telangana Assembly Elections : मुधोळची मोहीम आमदार राजेश पवारांकडून फत्ते, रामराव पाटलांची निर्णायक आघाडी

भाजपची कोणत्या राज्यात सत्ता आहे ?

आजच्या निकालानंतर आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यामुळे या राज्यात भाजप सत्ता स्थापन करेल. तर उत्तर प्रदेश, गुजरात, मणिपूर, गोवा, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. याबरोबरच नागालँड, सिक्कीम, महाराष्ट्र (Maharashtra), मेघालय या राज्यात भाजप युतीत सरकारमध्ये सहभागी आहे.

काँग्रेसची कोणत्या राज्यात सत्ता आहे ?

आजच्या निकालानंतर आता राजस्थान, छत्तीसगडमधील सत्ता काँग्रेसच्या हातातून गेली असून आता काँग्रेसची (Congress) सत्ता फक्त तीन राज्यात आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि आता तेलंगणा. तर झारखंड आणि बिहारमध्ये काँग्रेस आघाडी करत सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पाहता काँग्रेसचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Pm Modi and Rahul Gandhi
Madhya Pradesh Election Result : अनपेक्षित...धक्कादायक... : पृथ्वीराज चव्हाण मध्य प्रदेशातील पराभवामुळे उद्‌विग्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com