Rajya Sabha Election: राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर; मंत्री एस.जयशंकर यांच्यासह 'या' खासदारांचा कार्यकाळ पूर्ण

Election : तीन राज्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
Rajya Sabha Election
Rajya Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Political : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पारश्वभूमीवर सध्या सर्वज राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. असे असतानाच आता तीन राज्यांतील राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तीन राज्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

पश्चिम बंगाल, गोवा आणि गुजरातमधील राज्यसभेचे 10 सदस्य जुलै आणि ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली असून येत्या 24 जुलैला ही निवडणूक पार पडणार आहे.

Rajya Sabha Election
Madhya Pradesh Survey : मध्य प्रदेशात काँग्रेस की भाजपा? सर्व्हेतून मोठी आकडेवारी समोर

गुजरातमधील भाजपच्या तीन खासदारांचा कार्यकाळ येत्या 18 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, दिनेशचंद्र जेमलभाई अनवादिया, लोखंडवाला जुगलसिंह माथुरजी यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आहे.

तर दुसरीकडे गोव्यातील भाजपचे खासदार विनय डी तेंडुलकर यांचाही कार्यकाळ येत्या 28 जुलैला संपत आहे. तसेच पश्चिम बंगालमधून सहा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपत आहे. यामध्ये तृणमुल काँग्रेसचे खासदार सुश्मिता देव, शांता छेत्री, सुखेंदू शेखर राय, देरेक ओब्रिअन, डोला सेन तर काँग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य यांचा समावेश आहे.

कसा आहे राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम?

राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी 6 जुलै 2023 ला अर्ज करण्यास सुरवात होणार आहेत. तर 13 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच 14 जुलै 2023 ला अर्जाची छाननी होणार आहे. तसेच 17 जुलैला दाखल झालेले अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर 24 जुलैला निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर 24 जुलैलाच सायंकाळी 5 वाजेनंतर मतमोजणी होणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com