

देशातील फास्टॅग वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या नवीन वर्षांत गुड न्यूज दिली आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग घेण्यासाठी आवश्यक असलेली 'KYV' (Know Your Vehicle)ही प्रक्रिया आता NHAIने रद्द केली आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना होणार मनस्ताप कमी होणार आहे.
चारचाकी वाहन अर्थात कार, जीप किंवा व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेत असताना 'नो युअर व्हेईकल' (KYV) ही प्रक्रिया वाहनधारकांना पूर्ण करणे बंधनकारक होते. या प्रक्रियेमुळे अनेकवेळा आवश्यक कागदपत्रे असतानाही फास्टॅग सुरु होण्यास अडथळे येत होते. आता ही प्रक्रियाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) रद्द केली आहे.
'नो युअर व्हेईकल' (KYV) ही प्रक्रिया रद्द केली असली तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बँकांसाठीचे नियम कठोर केले आहे. नवीन बदल म्हणजे फास्टॅग अँक्टीव्ह करण्यापूर्वी बँकांना 'वाहन' (VAHAN) डेटाबेसवरून वाहनाची माहिती तपासणी करणे गरजेचे असेल. ही माहिती डेटाबेसमध्ये नसेल तर आरसी बूकव्दारे त्यांची तपासणी करण्यात येईल.
'नो युअर व्हेईकल' रद्द केल्याने जुन्या फास्टॅग धारकांचे काय होणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांकडे यापूर्वीचे फास्टॅग आहे, त्यांनाही आता नियमितपणे KYV करण्याची गरज उरणार नाही. काही वेळाच त्यांची आवश्यकता भासेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे.
वाहनधारकांने फास्टॅगचा चुकीचा वापर होत असल्याची तक्रार केल्यास दखल घेतली जाईल
टॅग चिकटवलेला नसल्यास किंवा तांत्रिक बिघाड असल्यास KYV ची गरज असेल.
चुकीच्या पद्धतीने टॅग जारी केला गेला असल्यास KYV ची गरज भासेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.