नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Niramala Sitharaman) संसदेत आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासासह देशभरातील रस्ते, रेल्वे (Railway) व इतर दळणवळणाच्या सुविधा बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पीएम गतीशक्ती इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अंतर्गत या सुविधांचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Union Budget 2022 Live Updates)
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी रेल्वेबाबत पहिली मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षात तब्बल 400 वंदे भारत रेल्वे धावणार आहे. वंदे भारत या मोदी सरकारने सुरू केलेल्या अंत्यत अत्याधुनिक रेल्वे गाड्या आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षात रेल्वे अधिक मॉडर्न करण्याच्यादृष्टीने केंद्रानं हे पाऊल टाकले मानले जात आहे. त्याचप्रमाणे गरज आणि स्थानिक परिस्थितीनुसार देशभरात मेर्टोचे जाळेही उभारले जाणार आहे.(Railway Budget Updates in Union Budget 2022)
पीएम गतीशक्ती प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये पायाभुत सुविधा विकसित करण्याबरोबरच यामाध्यमातून युवकांनाही रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशात पीपीपी तत्वावर चार ल़ॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. वन रेल्वे स्टेशन, वन प्रोडक्ट या योजनेची अंमलबजावणी करत स्थानिकांना प्रोत्साहन दिले जाईल.
पुढील वर्षभरात देशातील 60 किलोमीटर आठ रोपवे उभारले जाणार आहेत. शाश्वत विकासालाही सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्वाच्या घोषणा केल्या झिरो बजेट शेती, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आदी मुद्यांचा त्यांनी उल्लेख केला.
२०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे : (Union Budget 2022 Highlights)
- पुढच्या ५ वर्षात ५० लाख नोकऱ्या कशा निर्माण करता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील.
- आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्याला प्राधान्य दिले जाईल. लसीकरणावर सरकारचा अधिक भर.
- महिला, शेतकरी, तरुण वर्ग यांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले.
- नवीन आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर देखील महत्वाचे आहे, त्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत.
- LIC चा आयपीओ लवकरच येणार.
- पंतप्रधान गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधांवर सरकारचा भर.
- खासगी गुंतवणूक वाढवण्यावर तसंच दळणवळणाची साधने वाढवण्यावर भर देण्यात येईल.
- २०२० ते २०२३ या काळात नॅशनल महामार्गांचे जाळे २५ हजार किमीवर नेणार.
- रेल्वे आणि रस्ते निर्माणासाठी मोठी गुंतवणूक.
- जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांवर भर
- ४०० नव्या आणि आधुनिक दर्जाच्या वंदे भारत रेल्वे विकसीत करणार.
- नवीन शहरांमध्ये मेट्रो विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन देणार.
- पीपीपी तत्वावर देशात चार लॉजिस्टिक पार्क
- 60 किलोमीटरचे आठ रोपवे उभारणार
- शेतीतील आधुनिक करण्यावर भर, ड्रोनच्या वापरास बजेट मध्ये तरतूद...
- झिरो बजेट शेती, सेंद्रीय शेती आणि आधुनिक शेती यावरील अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन देणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.