FIR Against Priyanka Gandhi : प्रियांका गांधी-कमलनाथ यांच्यावर FIR दाखल; मध्य प्रदेशातील राजकारण तापलं

FIR Against Priyanka Gandhi And EX CM Kamalnath : "50 टक्के कमिशन दिले तरच आमच्या कामाचे पैसे दिले जातात," गंभीर आरोप..
FIR Against Priyanka Gandhi :
FIR Against Priyanka Gandhi :Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh) यांच्या सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदूरच्या संयोगितागंज पोलिस ठाण्यात प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्येष्ठ नेते अरुण यादव यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम ४२०, ४६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राज्य सरकार 50 टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. (Latest Marathi News)

FIR Against Priyanka Gandhi :
Mangalvedha NCP News : भालकेंची सोडचिठ्ठी, 'बीआरएस'ची एन्ट्री, पक्षातील बंड; मंगळवेढ्यात राष्ट्रवादीची स्थिती काय?

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी या प्रकरणाबाबत प्रियांका गांधी यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यांचे आरोप खोटे असल्याचे सांगून, मध्ये प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी त्यांच्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस नेत्याकडून पुरावे मागितले होते. राज्य सरकारसमोर कारवाईचे पर्याय खुले आहेत, असा इशाराही दिला होता.

प्रियांका गांधी यांनी काय केले आरोप?

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत दावा केला होता की, "मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या एका संघटनेने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली होती की, त्यांना पैशांची मागणी केली जाते. 50 टक्के कमिशन दिले तरच आमच्या कामाचे पैसे दिले जातात.

कर्नाटकमधील याआधीचे भ्रष्ट भाजप सरकार 40% कमिशन घेते होते. मध्य प्रदेशात मात्र भाजपने स्वतःच्या भ्रष्टाचाराचा विक्रम मोडीत काढला आहे. कर्नाटकच्या जनतेने 40% कमिशनचे सरकार हटवले, आता मध्य प्रदेशात प्रदेशातील जनता ५०% कमिशन देऊन सरकार हटवायला तयार आहे. "

FIR Against Priyanka Gandhi :
Sanjay Raut on PM Modi : मोदींना लोकसभेची निवडणूक सोपी राहिलेली नाही, नेहरू वंशातील एक "गांधी" त्यांच्या विरोधात उभा..

काँग्रेसचे उत्तर :

मध्य प्रदेश काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्ष के. के. मिश्रा म्हणाले की, "भाजप सरकार भ्रष्ट असल्याचे आम्ही सिद्ध करू. "भाजपने वास्तव स्वीकारले पाहिजे, पण सत्ताधारी पक्ष राजकीय दहशत निर्माण करत आहे. ते असंवैधानिक मार्ग अवलंबत आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com