FIR Filed Against Rahul Gandhi: राहुल गांधींचा पाय खोलात ; सावरकरांच्या नातवानंतर आता एका वकीलाकडून तक्रार दाखल

FIR Filed in Delhi Rahul Gandhi: वकिलाने केंब्रिज विद्यापीठात 28 फेब्रुवारीला दिलेल्या भाषणाबाबत खटला दाखल केला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi's Speech at Cambridge University: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी नुकतीच रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीबद्दल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावल्याने खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

यानंतरही राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवर काल (पुण्यात) तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता दिल्लीच्या वकिलाने केंब्रिज विद्यापीठात 28 फेब्रुवारीला दिलेल्या भाषणाबाबत खटला दाखल केला आहे. (Latest Political News)

Rahul Gandhi
Prakash Ambedkar News : प्रश्न सुटत नसतील तर आमदार-खासदारांना मारा ; प्रकाश आंबेडकरांचा अजब सल्ला ; म्हणाले..

दिल्लीतील तीस हजारी पोलिस चौकीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंब्रिज विद्यापीठात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडून आलेल्या सरकारबद्दल राहुल गांधी नकारात्मक बोलल्याचा आरोप वकील रवींद्र गुप्ता यांनी केला. राहुल यांनी परदेशी नागरिक आणि भारतातील नागरिकांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रवींद्र गुप्ता यांनी केला आहे.

Rahul Gandhi
Karnataka Elections 2023 : भाजपने दुसऱ्या यादीतही माजी मुख्यमंत्री शेट्टार यांना डावलले ; येदियुरप्पांचे पक्षश्रेष्ठींकडे साकडे

विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी त्यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात बदनामीचा फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी खोटे आरोप करून सावरकरांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्यकी यांनी यावेळी केला आहे. 15 तारखेला पुणे न्यायालयात या मानहानीचा दाव्यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com