Vasundhara Raje
Vasundhara Raje Sarkarnama

Rajasthan Politics: वसुंधरा राजेंना भाजपचा दणका; पहिल्या यादीत तर पत्ता कट...

Vasundhara Raje : वसुंधरा राजे यांना केंद्रात हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा

Jaipur News: राजस्थान विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जाते. सध्या राजस्थानच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपने आपली पहिली यादी जाहीर करून उमेदवारांची घोषणा केली. मात्र, तिकीट घोषणेत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना महत्त्व न दिल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत वसुंधरा राजे यांचा समावेश झाला नसल्याचे मानले जाते. तसेच वसुंधरा राजे यांच्या अनेक समर्थकांची भाजपने तिकिटे रद्द केली आहेत. यातच आता भाजपकडून वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना उमेदवारी न देता त्यांना केंद्रात आणण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपची पुढची रणनीती कशी असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये 29 नवीन उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे, पण माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना तिकीट मिळाले नाही. याशिवाय त्यांच्या अनेक समर्थक नेत्यांची तिकिटे कापली आहेत. त्यामुळे वसुंधरा राजे यांना भाजप कमकुवत करत आहे का ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना उमेदवारी न दिल्याने आगामी काळात त्या काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षश्रेष्ठींकडून केंद्रामध्ये येण्याचा निरोप देत त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची आता भूमिका काय असणार, याकडे लक्ष असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Vasundhara Raje
Nagar District Government Hospital: शिवसेना पदाधिकार्‍यांचा नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना 'डोस'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com