ओमिक्रॉनचा रुग्ण पाच दिवसांपूर्वीच पळाला दुबईला; नेमकं काय झालं वाचा...

भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून दोन रुग्ण आढळले आहेत.
Omicron
OmicronSarkarnama

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने शिरकाव केले आहे. कर्नाटकात (Karnataka) या विषाणुची बाधा झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) गुरूवारी याबाबत माहिती दिली. पण त्यापैकी एक रुग्ण पाच दिवसांपूर्वीच दुबईला (Dubai) पळून गेला आहे. हा रुग्ण दक्षिण आर्फिकेतून दुबईमार्गे 20 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात आला होता. त्याने लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

आरोग्य विभागाय सहसचिव लव अगरवाल यांनी भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्याची माहिती गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली होती. जगभरात आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. जगात या विषाणुचे आतापर्यंत 373 रुग्ण आढळून आले आहेत.

Omicron
ओमिक्रॉनचा धोका वाढला; एकाच रुग्णाच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा बंगळूरमधील डॉक्टर आहे. त्यांना 21 नोव्हेंबरला ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. नंतर ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे तपासणीतून समोर आले होते. त्यांच्या थेट संपर्कात 13 जण तर अप्रत्यक्ष संपर्कात 250 जण आले आहेत. सरकारने त्यांना शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यास सुरवात केली आहे.

दुसरा रुग्ण 20 तारखेला दक्षिण आर्फिकेतून दुबईमार्गे कर्नाटकात आला होता. त्याचे नमुने त्याचदिवळी विमानतळावर घेण्यात आले. येताना त्याने कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट आणले होते. पण भारतात चाचणी केल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला. मात्र त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. त्यावेळी तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी करत 22 तारखेला त्याचे नमुने जनुकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. त्याला हॉटेलमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता.

यादरम्यान रुग्णाने 23 तारखेला खासगी लॅबमध्ये पुन्हा चाचणी केली. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले. या दोन दिवसांत त्याच्या संपर्कात आलेले सुमारे 264 जणांची तपासणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर 27 तारखेला मध्यरात्री तो कॅबने विमानतळावर गेला. तिथून तो विमानाने दुबईला गेल्याची माहिती बेंगलुरू महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com