Parliamentary Session 2024: संसद अधिवेशनात 'या' मुद्यांवरुन सत्ताधारी-विरोधक येणार आमने-सामने

First Parliament Session 2024 18th Loksabha Starting Today Modi 3.0: नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली आहे.
Parliamentary Session 2024
Parliamentary Session 2024Sarkarnama

मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर आजपासून संसदेचे अधिवेशन (Parliamentary Session 2024) सुरू होत आहे. हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास असणार आहे. अधिवेशनाच्या 10 दिवसांत एकूण 8 बैठका होतील.

विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमिततेसह अन्य मुद्द्यांवरून विरोधक मोदी सरकारला (Modi 3.0) धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.

आजपासून सुरू होणारे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, सभापतींची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी 24 जून 2024 ते 3 जुलै 2024 या कालावधीत पहिले अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील.

सर्वप्रथम या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब सर्व खासदारांना शपथ देणार आहेत. यासोबतच सभापतीपदाची निवडणूक होणार आहे.

नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली आहे. नियमित अध्यक्षांची निवड होईपर्यंत महताब यांना काँग्रेसचे के. सुनील, द्रमुकचे टी. आर. बालू, भाजपचे राधामोहन सिंह, फग्गनसिंह कुलस्ते आणि तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय हे मदत करतील.

Parliamentary Session 2024
Video Kishore Darade: मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटले; अंधारेंच्या आरोपावर दराडे संतापले

राष्ट्रपती २७ जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला २८ जूनपासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान २ किंवा ३ जुलै रोजी चर्चेला उत्तर देतील.

असे असेल अधिवेशन

  • आज सर्वप्रथम भर्तृहारी महाताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील.

  • 24 आणि 25 जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील.

  • 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

  • राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे.

  • त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करतील.

  • यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत.

  • 29-30 जून रोजी शनिवार-रविवारमुळे सुट्टी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com