पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती; भाजपचे पाच आमदार निलंबित

West Bengal| Maharashtra| Trinmool Congress| २०२२ मध्ये होणाऱ्या सर्व अधिवेशांसाठी या पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
West Bengal Assembly
West Bengal Assembly sarkarnama

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सोमवारी विधानसभाध्यक्षांनी भाजपच्या पाच आमदारांचे निलंबन केले. यात विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari ) यांच्यासह भाजपच्या (BJP) पाच आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष बिमन बंदोपाध्याय यांनी निलंबनाची कारवाई केली. अधिकारी यांच्यासह दीपक बर्मन, शंकर घोष, मनोज तिग्गा आणि नरहरी महातो यांना २०२२मधील पूढील सर्व अधिवेशनांसाठी निलंबित करण्यात आले.

नक्की काय घडले?

पश्चिम बंगालमध्ये (West bengal) विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे ममता बॅनर्जी सरकार निशाण्यावर आले आहे. याचे पडसाद विधानसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यासाठी पश्चिम बंगालमध्ये सोमवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी टीएमसी सरकारवर आरोप केले. राज्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी बोलण्यास सुरुवात केली.

West Bengal Assembly
भाजपचे आमदार अडचणीत येताच अमित शहांनी थेट राज्यपालांनाच दिल्लीत बोलावून घेतलं

भाजपच्या सदस्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी लावून धरली. मात्र याच वेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमधील वाद टोकाला गेला. या वादामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारामारीत भाजप आमदार असित मजुमदार जखमी झाले असून मनोज तिग्गा यांचे कपडे फाटले. तर असित मजुमदार जखमी झाले.

पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने ममता बॅनर्जी यांनी या विषयावर निवेदन करावे अशी मागणी लावून धरली. या मुद्द्यावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २५ भाजप आमदारांनी सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत सभात्याग केला. तर दुसरीकडे, सभागृहात गदारोळ घालण्यासाठी भाजप कांगावा करत असल्याचा आरोप तृणमूलचे नेते आणि राज्याचे मंत्री फिरहद हकीम यांनी केला. तसेच, सभागृहातील धक्काबुक्कीमध्ये तृणमूल काँग्रेसचेही काही सदस्य जखमी झाल्याचा दावाही हकीम यांनी केला.

या गदारोळात कागदाचे तुकडे फाडून विधानसभा अध्यक्षांवर भिरकावण्यात आले. घंटानाद करून घोषणाबाजी व मारहाण करण्यात आली. या दरम्यान आमदार नरहरी महतो पडले आणि जखमी झाले, तर आपले कपडे फाडून मारहाण केल्याचा आरोप भाजप आमदार मनोज तिग्गा यांनी केला. भाजप आमदार असित मजुमदारही या गदारोळात जखमी झाले. त्यानंतर या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, विधानसभेतील या भांडणाचा व्हिडिओ पोस्ट करत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. 'पश्चिम बंगाल विधानसभेत हाणामारी. बंगालच्या राज्यपालानंतर, आता मुख्य व्हीप मनोज तिग्गा यांच्यासह टीएमसीच्या आमदारांनी भाजप आमदारांवर हल्ला केला, कारण ते सभागृहात रामपुरहाट हत्याकांडावर चर्चा करण्याची मागणी करत होते. ममता बॅनर्जीं नक्की काय लपवतत आहे?' असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com