पाच राज्यांच्या निवडणुकीचा संग्राम; पक्षीय बलाबल काय? हे मुद्दे गाजणार

पाच राज्याच्या निवडणुका जाहीर
Assembly Elections
Assembly Electionssarkarnama

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa), मणिपूर (Manipur), उत्तराखंड (Uttarakhand) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपणार आहे. गोवा राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्चला तर मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च व उत्तराखंडचा कार्यकाळ 23 मार्च आणि पंजाब राज्याचा कार्यकाळ 27 मार्चला संपनार आहे. या पाचही राज्यामध्ये मिळून विधानसभेच्या 690 जागा आहेत.

Assembly Elections
बिगुल वाजला! उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

या पाच पैकी चार राज्यामध्ये भाजपची (BJP) सत्ता आहे, तर पंजामध्ये काँग्रेसची (Congress) सतात आहे. देशातील सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये पुन्हा सत्ता मिळवणे हे भाजपसमोर मोठे आव्हाण असणार आहे. तर काँग्रेस समोरही पंजामधील सत्ता पुन्हा राखण्याचे आव्हाण आहे. तसेच भाजपला रोखण्यासाठी या राज्यातील सत्ता विरोधी पक्षांसाठी महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप, सपा, काँग्रेस आणि बसपा अशा चार पक्षांमध्ये निवडणूक रंगणार आहे. पंजामध्ये काँग्रेस, अकाली दल, आम आमदमी पार्टी, भाजप आणि व कॅ. अमरिंदर सिंह यांच्यात निवडणूक होणार आहे.

2017 चे विधानसभा निकाल असे होते.

उत्तर प्रदेशमध्ये एकून जागा 403 आहेत. येथे भाजपची सत्ता आहे. त्यामध्ये भाजपला 325 जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पार्टीला 47 आणि बसपला 19 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 07 जागा मिळालेल्या आहेत. त्यामध्ये राम मंदिर निर्माण, तीन कृषी कायद्यामुळे झालेले शेतकरी आंदोलन, हाथरस येथील बलात्कार प्रकरण, लखीमपूर खिरी येथील हिंसाचार आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगेतली कोरोना बळींचे मृतदेह हे मुद्दे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये एकूण जागा 70 आहेत. येथे भाजपची सत्ता आहे. भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 11 आणि इतर 02 जागा आहेत. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा लोकप्रिय चेहरा नाही. भाजपने सहा महिन्यात तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. शेतकरी आंदोलनाचा परिनाम या राज्यातही होण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळातील प्रशासन, तर काँग्रेसमध्ये हरिश रावत यांची नाराजी हे प्रमुख मुद्दे असणार आहेत.

गोव्यामध्ये एकूण 40 जागा आहेत. येथे भाजपची सत्ता आहे. त्यामध्ये भाजपला 17 आणि काँग्रेसला 13 जागा मिळालेल्या आहेत. म. गोमांतकपक्षाला 03 जागा आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाला 03 आणि इतर 04 जागा आहेत. गोव्यामध्ये रोनाल्ड़ोच्या पुतळ्याचा वाद हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. तृणमूल काँग्रेस आणि आपची एन्ट्री गोव्याच्या निवडणुकीत झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. येथे स्थानिक पक्षांच्या आघाड्या हाही महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

Assembly Elections
15 जानेवारीपर्यंत सर्व रॅलींवर बंदी! निवडणूक आयोगाचा निर्णय

मणिपूरमध्ये एकूण जागा 60 आहेत. भाजपला 21 आहेत. तर काँग्रेसला 28 जागा मिळालेल्या आहेत. एनपीपीला 04 आणि एनपीएफला 04 जागा मिळालेल्या आहेत. इतर 3 जागा आहेत. येथे भाजपची सत्ता आहे.

पंजाबमध्ये एकूण 117 जागा आहेत. या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. येथे काँग्रेसला 77 जागा मिळालेल्या आहेत. भाजपला 3 जागा आहेत. आम आमदमी पार्टीला 20 जागा मिळालेल्या आहेत. तर अकाली दल पक्षाच्या 15 जागा आहेत. इतर २ जागा आहेत. तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात पंजामधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेतकरी आंदोलन हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत वाद हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कॅ. अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, अंमली पदार्थांचे सावट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा सुरक्षा प्रश्न या मुद्यावर निवडणूक गाजण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com