New Delhi : संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी आज (दि.१७ सप्टेंबर) संसदेच्या नवीन इमारतीवर भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात आला. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, लोकसभेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे अनेक खासदार उपस्थित होते. (Latest Marathi News)
या सोहळ्यास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित नव्हते. आधीच ठरलेल्या आपल्या पूर्वनियोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच, सरकारने त्यांना या कार्यक्रमाचे उशिराने निमंत्रण पाठवले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना या सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही.
सोमवार 18 सप्टेंबरपासून संसदेचे पाचदिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या जुन्या इमारतीपासून होणार आहे. संसदेच्या नवीन इमारतीत दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कामकाज सुरू होईल. मात्र, आज नवीन इमारतीवर तिरंगा फडकवण्यात आला.
संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद तिवारी यांच्यासह अनेक नेते नवीन संसद भवनात ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित होते.
Edited By - Chetan Zadpe
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.