Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'वर घातली बंदी

Mamata Banerjee Bans The Kerala Story : तामिळनाडू पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर बंदी
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

West Bengal : 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. तर काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून कार्नाटकचे राजकारणही तापले आहे.

असे असतानाच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्याची घोषणा केली आहे. तसेच एका पत्रकार परिषदेत या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Mamata Banerjee
Maan News : आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, धनगर समाजाला सरकारने झुलवत ठेवले : नाना पटोले

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटावर आधी तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी आणली आहे.

Mamata Banerjee
Shivsena (UT) News : आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गट सज्ज, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिबीरातून करणार मार्गदर्शन..

यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "राज्यात शांतता राखण्यासाठी तसेच द्वेष आणि हिंसाचार टाळण्यासाठी द केरळ स्टोरी या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com