Congress News: काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर..

Former Andhra Pradesh CM Kiran Kumar Reddy Resigns from Congress: किरण कुमार रेड्डी भाजपमध्ये जाणार
 Kiran Kumar Reddy resigns from Congress
Kiran Kumar Reddy resigns from Congress Sarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh CM Resigns: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. "मी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा," असे रेड्डी यांनी खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे.

किरण कुमार रेड्डी यांनी २०१४ मध्येही काँग्रेसचा राजीनामा दिला होता. आंध्रप्रदेशचे विभाजन करुन तेलंगणा राज्याची निर्मिती होत असताना रेड्डी यांनी नाराजी व्यक्त करुन राजीनामा दिला होता. त्यांनी जय समैक्य आंध्र पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आंध्रप्रदेशाचे विभाजन होण्यापूर्वी किरण कुमार रेड्डी हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. ते दिवगंत मुख्यमंत्री वाईएस राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळातही मंत्री होते.

 Kiran Kumar Reddy resigns from Congress
Money Laundering : मोठी बातमी : आमदार राहुल कुल यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप ; राऊतांचे फडणवीसांना पत्र

त्यानंतर ते काही काळ विधानसभा अध्यक्षही होते. किरण कुमार रेड्डी यांचे वडील नल्लारि अमरनाथ रेड्डी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरसिंह राव यांचे निकटवर्तीय होते.

किरण कुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे नेते, खासदार मणिकम टागोर यांनी टीका केली आहे. "ज्या व्यक्तींनी पक्षाकडून सर्व काही मिळवलं आणि आंध्रप्रदेश काँग्रेस संपवली, ते आता भाजपच्या वाटेवर आहे," अशी टीका मणिकम टागोर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com