Yashwant Sinha: भाजपने नाकारलेला माजी मंत्री काढणार वाजपेयी यांच्या नावाने पक्ष

Yashwant Sinha Form New Party Named Atal Vichar Manch: चंपाई सोरेन झारखंड मुक्ति मोर्चाला (जेएमएम) सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता यशवंत सिन्हा हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे दिसते.
Yashwant Sinha Form New Party Named Atal Vichar Manch
Yashwant Sinha Form New Party Named Atal Vichar ManchSarkarnama
Published on
Updated on

तीन पक्ष बदलणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) लवकरच नवीन राजकीय इनिंग खेळणार आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकी पूर्वी ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.

आपल्या समर्थकांसोबत रविवारी झालेल्या बैठकीत नवा पक्ष स्थापन करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. बैठकीनंतर ते दिल्लीला रवाना झाले. लवकरच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा करुन अटल विचार मंच (AVM) स्थापन करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. यशवंत सिन्हा पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत असल्याचे दिसते.

सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सुरेंद्रकुमार सिन्हा भाजप कार्यकारणीचे माजी सदस्य आहेत. भाजपचे माजी खासदार जयंत सिन्हा यांचे समर्थकही बैठकीला उपस्थित होते.

झारखंड विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाले असताना माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन झारखंड मुक्ति मोर्चाला (जेएमएम) सोडचिठ्ठी दिली आहे. ते शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता यशवंत सिन्हा हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे दिसते.

यशवंत सिन्हा यांचा राजकीय प्रवास हा जनता दल, भाजप आणि तृणमूल काँग्रेस असा आहे. भाजपमध्ये असताना अनेक वादग्रस्त विधानामुळे अनेक वाद झाले होते. अगोदर वादग्रस्त विधान करणे नंतर यु-टर्न घेणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. 2022 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाचे ते दावेदार होते.

2014 मध्ये यशवंत सिन्हा यांचे सुपुत्र जयंत सिन्हा हे हजारीबाग येथून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण त्यांचे तिकीट कापून मनीष जयस्वाल यांनी उमेदवारी देण्यात आली. अडीच लाखाच्या लीडने जयस्वाल निवडून आले. "सध्याच्या राजकारणात 'चमकोगिरी' वाढत आहे. समाजाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराची गरज आहे, त्यामुळे वाजपेयी यांच्या नावाने पक्ष स्थापन करीत आहे," असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com