Mehbooba Mufti New: अनंतनाग-राजौरीत तिरंगी लढत; मेहबूबा मुफ्तींची राजकीय परीक्षा...

Anantnag Rajouri Lok Sabha Election 2024: अनंतनाग हा 'पीडीपी'चा बालेकिल्ला आहे आणि मुफ्ती यांच्या कुटुंबाची पाळेमुळे येथे रुजली आहेत.
Anantnag Rajouri Lok Sabha Election 2024
Anantnag Rajouri Lok Sabha Election 2024Sarkarnama

Srinagar, 23 May: जम्मू आणि काश्मीरमधील पाच लोकसभा जागांपैकी चार जागांवर मतदान झाल्यानंतर आता सहाव्या टप्यासाठी शनिवारी (ता.25) मतदान होत आहे. पीर-पंजाल पर्वतरांगांमध्ये विखुरलेल्या अनंतनाग-राजौरीत (Anantnag Rajouri Lok Sabha Election 2024) तिरंगी लढत होणार आहे.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा व राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्या राजकीय प्रभावाची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. काश्मीर आणि जम्मू या दोन्ही प्रांतांचा या मतदारसंघात समावेश आहे. या दोन्ही विभागातील क्षेत्र एकत्र करून हा मतदारसंघ नव्याने स्थापन झाला आहे. प्रमुख तीनही उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा व राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) प्रभावशाली आदिवासी नेते मियाँ अल्ताफ अहमद आणि जम्मू आणि काश्मीर अपना पार्टी (जेकेएपी)कडून जफर मन्हास हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अधिवक्ता मकबूल परे हेही यांच्यासह २० उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.

Anantnag Rajouri Lok Sabha Election 2024
Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून 2 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल

अनंतनाग हा 'पीडीपी'चा बालेकिल्ला आहे आणि मुफ्ती यांच्या कुटुंबाची पाळेमुळे येथे रुजली आहेत. कुटुंब आणि स्थानिक मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा मुफ्ती या प्रयत्नशील आहे.'जेकेएपी'चे जफर मन्हास हे प्रमुख पहाडी नेते आहेत. मियाँ अल्ताफ अहमद यांनी राजकीय आणि आध्यात्मिक प्रभावाचा वारसा उभा केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील आदिवासी समुदायांवर वर्चस्व आणि राजौरीतील प्रभावशाली आदिवासी कुटुंबांशी घनिष्ठ संबंध या बाबी अहमद यांच्यासाठी जमेच्या आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील सात, राजौरीतील चार, कुलगाम आणि पूंछमधील प्रत्येकी तीन आणि शोपियानमधील एक - 18 विधानसभा क्षेत्रांमध्ये पसरलेल्या - अनंतनाग-राजौरी मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा यांसारख्या नेत्यांसह जोरदार प्रचार सुरू आहे.

जम्मू प्रांतातील उधमपूर लोकसभा मतदारसंघ हा केंद्रशासित प्रदेशात 19 एप्रिल रोजी मतदान होणारा पहिला मतदारसंघ होता आणि कलम 370 रद्द केल्यापासून केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या मोठ्या निवडणूक लढतीत 68 टक्के मतदान झाले. गेल्या 30 दिवसांमध्ये या परिसरात चार दहशतवादी हल्ले झाले आहेत. या शेवटच्या लढतीत काश्मीर आणि जम्मू या दोन्ही प्रांतांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com