पंजाबनंतर आणखी एका राज्यात 'आप' देणार धक्का; बडा नेता लागला गळाला!

पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आपने आता शेजारील हरियानाकडे मोर्चा वळवला आहे.
Ashok Tanwar and Arvind Kejriwal
Ashok Tanwar and Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आम आदमी पक्षाने (AAP) आक्रमकपणे विस्तार सुरू केला आहे. आपच्या गळाला आता बडा नेता लागला आहे. हरियाना काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर (Ashok Tanwar) यांचा आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. यामुळे हरियानात आपची ताकद वाढली आहे.

अशोक तंवर हे हरियानातील माजी खासदार आहेत. ते हरियाना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच, ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसला रामराम केला होता. नंतर त्यांनी अपना भारत मोर्चा हा पक्ष स्थापन केला होता. तंवर हे आधी राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जात. परंतु, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हूडा आणि इतर नेत्यांसोबत मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस सोडली होती. त्यानंतर ते तृणमूलसोबत गेले होते. हरियानातील ते वजनदार नेते असल्याने आपला तेथे पक्ष विस्तार करण्यास वाव मिळणार आहे.

Ashok Tanwar and Arvind Kejriwal
तीन तासांच्या चौकशीनंतर दरेकर बाहेर आले अन् म्हणाले, मला भंडावून सोडलं!

तंवर यांनी मागील वर्षी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी तृणमूल सोडून आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनीच ट्विटरवर याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, लोकांच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे. समाजाची सेवा करण्यासाठी मी हे पाऊल उचलत आहे. आम आदमी पक्षाशी जोडले जाताना मला आनंद आहे. प्रामाणिक राजकारण आणि सुशासनासाठी काम करणाऱ्या आपसोबत मी जात आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी अरविंद केजरीवाल यांचे आभार मानतो.

Ashok Tanwar and Arvind Kejriwal
दरेकर अडचणीत येताच सगळ्यात आधी भाजपचे प्रसाद लाड धावले!

पंजाबमध्ये आपने दणदणीत विजय मिळवला आहे. आपने पंजाबमध्ये 117 पैकी तब्बल 92 जागा जिंकत काँग्रेसचा दारूण पराभव केला. आपने आता पंजाबशेजारील हरियानाकडे मोर्चा वळवला आहे. अशोक तंवर यांचा पक्षप्रवेश आपसाठी फायद्याचा ठरणार आहे. हरियानातील आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आपने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. यामुळे पंजाबप्रमाणे हरियानातही आप धक्का देऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com