Sonia Gandhi Health News : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत अपडेट समोर..

Sonia Gandhi admitted to hospital : डॉक्टरांच्या एका टीमच्या निरीक्षणाखाली त्यांची देखरेख करण्यात येत आहे.
Sonia Gandhi
Sonia GandhiSarkarnama

Delhi News : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याबाबतची माहिती समोर येत आहे. गांधी यांना सौम्य स्वरूपाच्या तापाची लक्षणे दिसून आले आहे. यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. सध्या गांधी यांच्यावर प्राथमिक उपचार केले असून, त्यांची प्रकती स्थिर असल्याचे समजते आहे. डॉक्टरांच्या एका टीमच्या निरीक्षणाखाली त्यांची देखरेख करण्यात येत आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, काल शनिवारी रात्री उशीरा सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वस्थता जाणवत होती. त्यांनी सौम्य तापाची लक्षणे दिसत होती. यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी मार्च महिन्यातही गांधी यांच्या प्रकृतीत बिघाड झाली होती. त्यावेळीही त्यांना सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा एका दिवसात त्यांना दिवसात त्यांची प्रकृची बरी असल्याचे निदान करून, त्यांनी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

इंडिया आघाडीचा सर्व विरोधा पक्षांची मोट बांधल्यानंतर सोनिया गांधी राजकारणात सक्रिय दिसत आहेत. नुकताच त्यांनी मुंबई दौरा केला होता. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या इंडियाच्या बैठकीत गांधी हजर राहिल्या होत्या. (Sonia Gandhi admitted to hospital; Health update ahead)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com