माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांचा तुरुंगवास

न्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौटालांच्या मालमत्तांपैकी चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.
Om Prakash Chautala
Om Prakash Chautalasarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कोर्टाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना चार वर्षांचा कारावास आणि ५० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी ही शिक्षा सुनावली.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी २६ मार्च २०१० रोजी आरोपपत्र दाखल केले होते. यात आरोप करण्यात आला होता की चौटाला यांची 6.09 कोटी रुपयांची संपत्ती 1993 ते 2006 या कालावधीत त्यांची संपत्ती उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक आहे. सीबीआय (CBI) ने वर्ष 2005मध्ये एफआयआर दाखल केली आहे.

Om Prakash Chautala
आमच्यावर टीका झाली तरी तुमचा तोल ढळू देऊ नका ; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

न्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौटालांच्या मालमत्तांपैकी चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. या आधी दिल्लीतील एका न्यायालयाने चोटाला यांना उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा धिक संपत्ती जमा केल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. १९९३ ते २००६ दरम्यान सहा कोटी नऊ लाख रुपये किमतीची मालमत्ता जमविल्याचा आरोप चौटाला यांच्यावर आहे. ती १८९.११ टक्क्यांनी अधिक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

Om Prakash Chautala
माझे मंत्रीपद काढूनच घ्या ; काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

न्यायालयाने चौटाला यांना गेल्या आठवडय़ात दोषी ठरवताना नमूद केले होते, की या मालमत्तेबाबतचा हिशेब समाधानकारकरीत्या देण्यात चौटाला अपयशी ठरले आहेत. ज्या काळात या मालमत्ता चौटाला यांनी घेतल्या, त्या काळातील त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांविषयी समाधानकारक खुलासा ते देऊ शकले नाहीत.या शिक्षेसोबतच चौटाला यांच्या चार मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. यात हेलीरोड, पंचकूला, गुरुग्राम आणि असोला येथील संपत्तीचा समावेश आहे. ओमप्रकाश चौटाला यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे.

  • शिक्षा भोगताना वेळेचा सदुपयोग करत हरियाणाचे 82 वर्षीय माजी मूख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी इयत्ता 12 वीची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तर्ण केली.

  • शिक्षेच्या काळात त्यांनी तिहार जेलमध्ये कैद्यांसाठी बनविण्यात आलेल्या सेंटरवर नॅशनल ओपन स्कूलद्वारा करण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत सहभाग नोंदवला होता.

  • परीक्षा झाली तेव्हा ते पॅरोलवरती बाहेर होते आणि परिक्षा केंद्र कारागृहात होते. या वेळी ते पुन्हा एकदा कारागृहात गेले. त्यांनी परीक्षा दिली आणि ते उत्तीर्णही झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com