Islamabad News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सायफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष शाह मुहम्मद कुरेशी यांनादेखील १० वर्षांची शिक्षा झाली. या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच निवडणुकीपूर्वी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्याआधी इम्रान खान यांना झालेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या पीटीआय पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. कारण, दोन्ही मतदारसंघासाठीचे त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने यापूवीच फेटाळले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशेष कोर्टाने ऑफिशियल सिक्रेट अॅक्टच्या अंतर्गत ही शिक्षा सुनावली असल्याचं पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने सांगितले आहे. दरम्यान, या शिक्षेमुळे येत्या काळात इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज फेटाळल्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाने म्हटले आहे की, इम्रान खान हे मतदारसंघाचे नोंदणीकृत मतदार नाहीत. यााशिवाय न्यायालयाने त्यांना दोषी आणि अयोग्य ठरवले आहे. तर त्यांची उमेदवारी रद्द झाल्याची माहिती त्यांच्या मीडिया टीमने दिले आहे.
R...