Satara Political News : माजी सहकारमंत्र्यांनी न्यायालयीन लढाई जिंकली; विकासकामांवरील स्थगिती उठली...

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात साकव पुलाचे भूमिपूजन
Balasaheb Patil
Balasaheb PatilSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या. त्यामध्ये तीन वेळा सत्तानाट्य घडले. त्यामुळे या पाच वर्षांत जनतेला फक्त राजकीय गोंधळच पाहावयास मिळाला आहे. प्रत्येकाने सत्तेवर येताच विरोधकांनी विकासकामे अडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसल्याची परिस्थिती आहे. (Balasaheb Patil's Development work stopped)

तशीच काहीशी स्थिती सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. राज्याचे माजी सहकारमंत्री व शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती न्यायालयीन लढा देऊन उठली असल्याने विकासकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

Balasaheb Patil
Rajya Sabha Election : 'व्हीप'ने उडवली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची झोप !

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकारमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना महायुती सरकारने स्थगिती दिली होती. त्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयीन लढाई जिंकून कराड उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांवरील स्थगिती आदेश उठविण्यास राज्य सरकारला भाग पाडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थगिती उठलेली सर्व कामे सुरू झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सातारा तालुक्यातील नांदगाव येथे आमदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना 2023 - 24 मधून साकव योजनेअंतर्गत कन्हेर उजव्या कालव्याच्या कॅनॉलवर गावच्या हद्दीत साकव पूल बांधण्यासाठी 53 लाख 84 हजार मंजूर झाले. त्या साकव पुलाचे भूमिपूजन नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘‘या साकव पुलामुळे फत्त्यापूर, लिंबाचीवाडी, टिटवेवाडी, खोजेवाडी, देशमुखनगर, नांदगाव या गावांतील शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. पुलावरून शेतीमाल ने - आण करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना सोयीची ठरणार आहे. निवडणुकीपुरते कोणी काहीही बोलत असते, त्यामुळे निवडणुकीपुरते राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहा.’’

यावेळी रामचंद्र जगदाळे, विजय घोरपडे, चंद्रकांत घोरपडे, मनोहर घाडगे, संजय कुंभार, सुनील काटे, प्रकाश घोरपडे, विजय घोरपडे, सुरेश माने, मनोहर घाडगे, शीला सावंत, रामदास कणसे, सतीश मोरे, डॉ. सावंत, हणमंत घाडगे, गजानन देशमुख, तसेच नांदगाव, फत्त्यापूर, टिटवेवाडी, देशमुखनगर, लिंबाचीवाडी आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.

R...

Balasaheb Patil
BJP Leader Murder Case : भाजपच्या ओबीसी नेत्याच्या हत्येप्रकरणी 15 जणांना मृत्युदंडाची शिक्षा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com