काँग्रेस रसातळाला चाललीय! माजी केंद्रीय मंत्र्याचा पक्ष सोडताच गांधी कुटुंबावर निशाणा

काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, माजी केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
Sonia Gandhi with Ashwani Kumar
Sonia Gandhi with Ashwani Kumar Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कायदा मंत्री डॉ.अश्वनी कुमार (Ashwani Kumar) यांनी पक्षाला रामराम केला आहे. पक्ष सोडताच कुमार यांनी पक्ष नेतृत्वावर निशाणा साधला आहे. आगामी काळात काँग्रेसची घसरण होत असल्याचे मला सध्या दिसत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अश्वनी कुमार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. मात्र, त्यांनी सोनिया गांधी अथवा राहुल गांधी यांचे नाव घेणे टाळले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एक वेळ अशी येते की त्यापुढे तुम्ही सहन करू शकत नाही. नजीकच्या काळात मला काँग्रेसची घसरणच दिसत आहे. देशातील परिस्थितीचे प्रतिबिंब काँग्रेसमध्ये पडताना दिसत नाही. पक्षाने पुढे केलेला नेता हा जनतेला आवडला नसेल. अनेकवेळा हा प्रश्न विचारला जातो की, पंतप्रधानांवर देशातील जनता नाराज असेल तर काँग्रेस का निवडून येत नाही? याचे मूळ कारण म्हणजे आपण देत असलेला पर्याय जनतेला स्वीकारार्ह नाही. नेमका हाच मुद्दा पक्षातील चर्चेतून बाहेर ठेवला जातो.

Sonia Gandhi with Ashwani Kumar
अखेर मंत्रिपुत्र तुरूंगातून बाहेर पण पुढील नव्हे तर मागील दाराने!

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये अश्वनी कुमार हे कायदा मंत्री होते. ते तब्बल 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेत आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आणि माझा सन्मान कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेत आहे. पक्षाच्या बाहेर राहून व्यापक देशहिताचे काम करण्याचा माझा मानस आहे.

Sonia Gandhi with Ashwani Kumar
योगीपुराण! चित्रा रामकृष्ण यांच्या हेअरस्टाईलपासून एकत्रित परदेश सहलीपर्यंत

दरम्यान, मागील महिन्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. सिंह यांच्या रुपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला आहे. यावरून आता काँग्रेसने सिंह यांच्यावर हल्लाबोल केला असून, त्यांना पळपुटे ठरवले आहे. काँग्रेस नुकतीच तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला होता. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com