Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Results 2023: मध्य प्रदेश - राजस्थानात भाजप सुपरफास्ट तर काँग्रेस...
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results :
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results :Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

राजस्थान निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. काँग्रेसने आपली सत्ता गमावली असल्यामुळे त्यांना आता विरोधात बसावे लागणार आहे. भाजप आता 113 जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला 72 जागांवर समाधान मानावे लागले.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. मध्य प्रदेशमधील 230 जागांपैकी भाजपने 165 जागा मिळवत यश संपादन केले आहे, तर काँग्रेसच्या पदरी निराशाच आली आहे. काँग्रेसला इथे फक्त 64 जागांवर समाधान मानावे लागले.

राजस्थानच्या झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे यांनी विजय मिळवला आहे. तब्बल 53193 मतांनी त्यांना झालरापाटनमधून दणदणीत विजय संपादन केला, तर टोक या मतदारसंघातून काँग्रेसचे सचिन पायलट विजयी झाले. पायलट हे जवळपास 30 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

राजस्थानच्या झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे यांनी विजय मिळवला आहे. तब्बल 53193 मतांनी त्यांना झालरापाटनमधून दणदणीत विजय संपादन केला.

आता राजस्थान आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. राजस्थानात वसुंधरा राजे, दिया कुमारी, योगी बालकनाथ यांची नावे चर्चेत आहेत, तर मध्य प्रदेशात पुन्हा शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे, तर या स्पर्धेत ज्योतिरादित्य शिंदे यांचाही समावेश होऊ शकतो.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. मध्य प्रदेशमधील 230 जागांपैकी भाजपने 165 जागा मिळवत यश संपादन केले आहे, तर काँग्रेसच्या पदरी निराशाच आली आहे. काँग्रेसला इथे फक्त 64 जागांवर समाधान मानावे लागले.

राजस्थानात काँग्रेसला आपली सत्ता गमावावी लागली आहे. भाजपने राजस्थानात जोरदार मुसंडी मारली आहे. 199 जागांपैकी भादने 115, तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावे लागले.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : वसुंधरा राजे, सचिन पायलट यांनी राखला गड; मोठ्या मताधिक्याने विजयी!

राजस्थानच्या झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरान राजे यांनी विजय मिळवला आहे. तब्बल 53193 मतांनी त्यांनी झालरापाटनमधून दणदणीत विजय संपादन केला, तर टोक या मतदारसंघातून काँग्रेसचे सचिन पायलट विजयी झाले. पायलट हे जवळपास 30 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : भाजपच्या वसुंधरा राजे विजयी, 53 हजार मताधिक्याने मारली बाजी!

राजस्थानच्या झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे यांनी विजय मिळवला आहे. तब्बल 53193 मतांनी त्यांना झालरापाटनमधून दणदणीत विजय संपादन केला!

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्य प्रदेशात 4 उमेदवार विजयी

मध्य प्रदेशात दुपारी 3.25 वाजेपर्यंत 4 उमेदवार विजयी झाले आहेत. यात भाजपचे 3 उमेदवार आणि बसपाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. .

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थानमध्ये आतापर्यंत 17 उमेदवार विजयी -

राजस्थानमध्ये दुपारी 3.15. वाजेपर्यंत 17 उमेदवार विजयी झाले असून, यात भाजपचे 13, तर काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. भारत आदिवासी पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थानचे सात उमेदवार विजयी -

राजस्थानमधून या क्षणापर्यंत 7 जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर झाले आहेत. यापैकी 5 जागांवर भाजप विजयी झाले आहे, तर काँग्रेस आणि भारत आदिवासी पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहे .

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थानात सत्ताबदलाची परंपरा कायम...

राजस्थानात सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहिली आहे. हाती आलेल्या कलांनुसार भाजपला निर्विवाद बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकली गेली आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थानचा पहिला उमेदवार विजयी :

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे पहिला निकाल हाती आला आहे. यामध्ये भारत आदिवासी पक्षाचे राजकुमार रोट विजयी झाले आहेत. ते राजस्थानच्या चौरासी मतदारसंघातून उमेदवार होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुशील कटारा आणि काँग्रेसचे ताराचंद भगोरा यांचा पराभव केला आहे. राजकुमार रोट सुमारे 70 हजार मतांनी विजयी झाले.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्य प्रदेशात पुन्हा 'कमल'राज, तर काँग्रेसचे 'कमल अनाथ..'

मध्य प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारली. 230 जागांपैकी भाजप तब्बल 162 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला केवळ 66 जागांवर आघाडी मिळाली आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : वसुंधरा राजे आघाडीवर...

राजस्थानच्या झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे २४ हजार मतांनी आघाडीवर आहेत..

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्य प्रदेश भाजपचं दीडशतक तर राजस्थानात शतक...

मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांच्या आकडेवारीनुसार भाजप 157 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस केवळ 68 जागांवर आघाडीवर..

राजस्थानमध्ये 100 जागावंर भाजप आघाडीवर, काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर..

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्य प्रदेश-राजस्थान भाजपचंच; काँग्रसेच्या पदरी निराशा...

मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपची जोरदार मुसंडी. आतापर्यंत हाती आलेल्या कलांच्या आकडेवारीनुसार भाजप 157 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस केवळ 72 जागांवर आघाडीवर..

राजस्थानमध्ये 130 जागावंर भाजप आघाडीवर, काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर..

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results :काँग्रेसचे कमलनाथ पिछाडीवर, तर अशोक गेहलोत आघाडीवर..

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आघाडीवर आहेत, तर मध्य प्रदेशात छिंदवाडा मतदारसंघातून काँग्रसेचे दिग्गज नेते कमलनाथ आघाडीवर आहेत...

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्य प्रदेश - राजस्थानात भाजप सुपरफास्ट तर काँग्रेसची पीछेहाट..

मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशात भाजप 150 जागांवर आघाजीवर तर काँग्रेस केवळ 78 जागांवर आघाडीवर..

राजस्थानमध्ये 125 जागावंर भाजप आघाडीवर, काँग्रेस 62 जागांवर आघाडीवर..

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : भाजपने कलांमध्ये पार केला बहुमताचा आकडा...

भाजपने मध्यप्रदेशात भाजपने सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. 230 जागांपैकी भाजपने 121 जागांवर आघाडी घेत बहुमताच्या आकड्याला स्पर्श केला आहे. तर काँग्रसला 91 जागांवर आघाडी आहे.

तर राजस्थानमध्ये भाजपने 100 जागांवर आघाडी घेत बहुमत गाठले आहे. तर काँग्रेस 85 जांगांवर आघाडीवर आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results :वसुंधरा राजे आघाडीवर..

मध्य प्रदेशात झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे आघाडीवर आहे. भाजपने त्यांनी साइडलाइन केले अशी चर्चा होती. आता त्यांनी सुरुवातीच्या कलात आघाडी घेतली आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्य प्रदेशात क्षणाक्षणाला बदलाहेत आकडे..

मध्य प्रदेशात क्षणाक्षणाला आकडे बदलत आहेत. कधी काँग्रेस तर भाजप आघाडीवर आहे. आता भाजपने आघाडी घेतली असून भाजप 114 तर काँग्रेस 91 जागांवर आघाडीवर आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात भाजपची आघाडी!

राजस्थानात भाजपने काँग्रेसला मागे सोडत आघाडी घेतली. भाजपने इथे कलांमध्ये शतक गाठलं काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी

मध्यप्रदेश ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेसने आश्चर्यकारकपणे आघाडी घेतली आहे. ७५ जागांवर काँग्रेस तर भाजपने ७२ जागांवर आघाडी घेतली.

Madhya Pradesh Assembly Election Results : दिग्गज नेते आघाडीवर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, दिग्गज नेते कैलास विजयवर्गीय, काँग्रेसचे कमलनाथ आघाडीवर आहेत.

Madhya Pradesh Assembly Election Results : मध्य प्रदेशात  भाजपच आघाडीवर

मध्य प्रदेशात भाजप काँग्रेसला मागे टाकत सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली. 80 जागांवर भाजप, तर 65 जागांवर काँग्रेसने आघाड घेतली आहे.

Rajasthan Assembly Election live Updates: काँग्रेसचे सचिन पायलट आघाडीवर

राजस्थानच्या टोंक या मतदारसंघातून काँग्रेसचे सचिन पायलट आघाडीवर आहेत.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election : मध्य प्रदेश-राजस्थानात अटीतटीची लढत!

राजस्थानात कल समोर - भाजप 60 जागांवर तर काँग्रेस 50 जागांवर आघाडीवर व इतर आणि अपक्ष १० जागांवर आघाडीवर

मध्यप्रदेशात 100 जागांचे कल आले आहेत. भाजप 50 तर काँग्रेसही 50 जागांवर आघाडीवर आहे.मध्यप्रदेशात अपेक्षेप्रमाणे अत्यंत अटीतटीची लढत होत आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election : सुरुवातीच्या कलापासून काटे की टक्कर!

राजस्थानचे 54 जागांचे कल हाती आले आहेत. सुरूवातीच्या कलात 30 जागा भाजप तर 24 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

मध्यप्रदेशात 85 जागांचे हाती आहे आहे. इथे भाजप 45 तर, काँग्रेस 40 जांगावर आघाडीवर आहे. सुरूवातीच्या कलात भाज आघाडीवर आहे.

Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election : मध्य प्रदेश-राजस्थानात कोण मारणार बाजी? 

मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. मध्यप्रदेशात आजपर्यंत सर्वाच जास्ता 77.15 टक्के मतदान पार पडले होते. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार इथे काँग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत अटीतटीची लढत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान झाले. एका उमेदवाराच्य निधनामुळे करणपूर या जागेवरची निवडणूक स्थगित करत, ते पुढे ढकलण्यात आहे. राजस्थान 199 जागांसाठी 863 उमेदवार भवितव्य आज निकाला उलगडणार आहे. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ता बदलाची पंरपरा आहे, ही परंपरा बदलणार की, भाजप सत्तेच्या जवळ जाणार आता काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com