NIA Action On Terror Funding: 'एनआयए'ची टेरर फंडिंगविरोधात कारवाई; काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत छापेमारी

Jammu-Kashmir | टेरर फंडिंग आणि ओव्हर ग्राउंड नेटवर्कच्या संदर्भात जम्मू-काश्मीरमध्ये तपास यंत्रणा NIA कडून छापे टाकले जात आहेत.
NIA Action On Terror Funding:
NIA Action On Terror Funding:Sarkarnama

Action On Terror Funding : राष्ट्रीय तपास यंत्रणांनी (NIA) तपास यंत्रणा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, शोपियान, राजौरी आणि पूंछ याठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादाला निधी पुरवल्याप्रकरणी या छापेमारी केल्याची माहिती आहे. सध्या कोणालाही ताब्यात घेतल्याचे वृत्त नाही. (From Kashmir to Tamil Nadu, 'NIA' action against terror funding)

याआधी 2 मे रोजी जम्मू-काश्मीर, पीर पंजाल, मध्य आणि दक्षिण काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये 12 ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपास करण्यात आला होता. दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया करण्यासाठी, गुन्हेगारी कट रचण्यासाठी, बंडखोरी नेटवर्क आणि इतर बाबींसाठी ही मोठी कारवाई करण्यात आली होती. (National News)

NIA Action On Terror Funding:
Manipur Violence: शिंदे फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परतले

याशिवाय तामिळनाडूतील 10 हून अधिक ठिकाणी एनआयएची शोधमोहीम सुरू आहे. पीएफआयशी संबंधित काही लोक आणि नेत्यांच्या ठिकाणांवर तपास यंत्रणांनी छापेमारी सुरु केली आहे. याआधी केलेल्या कारवाईदरम्यान देशभरातून PFI च्या आणखी 106 सदस्यांना अटक करण्यात आली होती. (NIA Action)

पीएफआयशी संबंधित अशी अनेक कागदपत्रे समोर येत आहेत, ज्यामध्ये पीएफआय दहशतवादी संघटना म्हणून काम करत असल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजी एनआयएने उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील 17 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. यापूर्वी, एनआयएने हिजबुल मुजाहिद्दीनचा नेता सय्यद सलाहुद्दीनच्या दोन मुलांचे जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात असलेले घर आणि दोन कालवे जमीन जप्त केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com