New Delhi : नवी दिल्ली येथे आयोजित G-20 अध्यक्षपदासाठी भारताने मोठे पाऊल टाकले आहे. यावेळी 'नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र' सदस्य देशांच्या संमतीने स्वीकारण्यात आले. परिषदेत दुसऱ्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. मोदी म्हणाले, "परिषदेचे आमचे आयोजकांच्या प्रयत्नांमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे नवी दिल्ली G-20 लीडर्स समिट घोषणापत्रावर एकमत झाले आहे, ही चांगली गोष्ट या निमित्ताने समोर आली." (Latest Marathi News)
'हा G20 जाहीरनामा स्वीकारावा, असा माझा प्रस्ताव आहे,' असे आवाहन मोदींनी केले. त्यानुसार सदस्यांच्या मान्यता आणि सहमतीनंतर प्रस्तावाचा स्वीकार केला. मोदी म्हणाले, ' माझे मंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो, ज्यांनी आपल्या परिश्रमाने हे शक्य केले.'
जागतिक नेत्यांचे भव्य स्वागत -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी G20 शिखर परिषदेत 'भारत मंडपम' येथे जागतिक नेत्यांचे स्वागत केले. यावेळी स्वागत स्थळापाशी G20 लोगो आणि दुसऱ्या बाजूला भारताची G20 अध्यक्षपदाची थीम 'वसुधैव कुटुंबकम् - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' असा संदेश दिला गेला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.