नवी दिल्ली : काँग्रेसमधील (Congress) नाराज गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जी 23' (G 23) मधील नेत्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर हे नेते आक्रमक झाले असून बुधवारी महत्वपूर्ण बैठकही झाली. या बैठकीत काँग्रेसमधील नेतृत्वात बदल करण्याबाबत ठाम भूमिका घेण्यात आली आहे. काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
जी 23 मधील नेत्यांची बुधवारी रात्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या दिल्लीतील घरी एकत्रित आले होते. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह कपिल सिब्बल (Kapil Sibal), आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शशी थरूर, राज बब्बर, कुलदीप शर्मा, प्रणित कौर, एम. ए. खान, शंकर सिंह वाघेला, मणिशंकर अय्यर, पी. जे. कुरियन, राजेंद्र कौर भट्टल, संदीप दिक्षीत या नेत्यांचा समावेश आहे.
बैठकीनंतर या नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिध्द करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'काँग्रेसला पुढे जाण्यासाठी एकमेव पर्याय आहे. सर्व स्तरावर सामूहिक, समावेशक नेतृत्वाला स्वीकारायला हवे. भाजपशी (BJP) दोन हात करायचे असतील तर काँग्रेसला मजबूत करणे गरजेचे आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विश्वसनीय पर्याय तयार करण्यासाठी समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत चर्चा करावी,' असंही या नेत्यांनी म्हटलं आहे.
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर हे नेते पुन्हा सक्रीय झाले आहेत. बुधवारच्या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद हे गुरूवारी सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जी 23 गटाने गांधी कुटुंबातील नेतृत्वाला विरोध केला आहे. त्यावरून सध्या काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
कपिल सिब्बल यांचा यांचा थेट निशाणा
कपिल सिब्बल यांनी नुकतेच एका मुलाखतीत गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व सोडत इतरांना संधी द्यायला हवी, असं स्पष्ट केलं होतं. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष नसले तरी तेच निर्णय घेत असल्याची टीकाही सिब्बल यांनी केली आहे. या वक्तव्यांमुळे जी 23 नेत्यांनी बुधवारची बैठकी सिब्बल यांच्या घराऐवजी आझाद यांच्याकडे घेतल्याचे समजते. पक्षाचे चुकीचा संदेश जाऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.