तिहारमध्ये कडेकोट बंदोबस्तात असलेला छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील 'एम्स'मध्ये दाखल

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार कारागृहात कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
gangster chota rajan tests covid positive and shifted to delhi aiims
gangster chota rajan tests covid positive and shifted to delhi aiims
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आता तिहार कारागृहात अतिशय कडेकोट बंदोबस्तात असलेला अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ राजन हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याला दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्सम) तातडीने दाखल करण्यात आले आहे. न्यायालयीन सुनावणीवेळी हा प्रकार समोर आला आहे. 

राजन (वय 61) याचे इंडोनेशियातून प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याला बालीतून 2015 मध्ये भारतात आणले होते. तेव्हापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मुंबईत दाखल असलेले सर्व खटले केंद्रीय अन्वेषण विभागाकडे  (सीबीआय) वर्ग करण्यात आले आहेत. हे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याता आली आहे. राजन याच्या विरोधात खंडणी आणि खुनाचे तब्बल 70 खटले प्रलंबित आहेत. 

राजन याच्यावरील प्रकरणाची न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी तिहारच्या कारागृह अधिकाऱ्यांनी राजनला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, त्याला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केल्याचेही सांगितले. 

राजन याला 2018 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या 2011 मधील हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील आठवड्यात हनिफ कडावाला याच्या हत्या प्रकरणातून राजन याची मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मुक्तता केली होती. कडावाला हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता. 

देशात कोरोनामुळे 24 तासांत 2 हजार 771 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 894 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 23 हजार 144 रुग्ण सापडले असून, 2 हजार 771 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाख 82 हजार 204 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.34 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.54 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com