सिद्धूच्या हत्येचा तिहारमध्ये शिजला कट! मुख्य सूत्रधार असलेल्या गँगस्टरची सुरक्षा वाढवली

गँगस्टर बिष्णोईच्या हिटलिस्टवर सलमान खानही
Lawrence Bishnoi
Lawrence BishnoiSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळं राज्यभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सिद्धूच्या हत्येमागे गँगवॉर हेच कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याचबरोर या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानं स्वीकारली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. अभिनेता सलमान खानही त्याच्या हिटलिस्टवर असल्याचं मागं समोर आलं होतं. (Sidhu Moose Wala News Updates)

गँगस्टर बिष्णोई हा सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. पंजाब पोलीस मला चकमकीत ठार मारतील, अशी भीती व्यक्त करीत बिष्णोईने न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा ताबा पंजाब पोलिसांकडे देऊ नये, अशी मागणी त्यानं न्यायालयाकडं केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विष्णोईच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून दिल्ली पोलिसांनी तिहारमध्ये असलेल्या बिष्णोईची सुरक्षा वाढवली आहे. त्यानेच कारागृहात बसून सिद्धूच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.

बिष्णोईचा कॅनडास्थित सहकारी गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगची असल्याचे सोशल मीडियावर म्हटलं आहे. लॉरेन्स बिष्णोई गँग आणि तो स्वत: या हत्येमागे असल्याचं गोल्डीनं म्हटलं आहे. अकाली दलाचा तरुण नेता विकी मिद्दुखेरा याच्या हत्या प्रकरणात सिद्धूचे नावही होते, असा दावाही त्यानं केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, आमचा भाऊ विक्रमजितसिंग मिद्दुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येत मूसेवालाचे नाव समोर आले होते. परंतु, पंजाब पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याचबरोबर आमचा सहकारी अंकित भादू याच्या एन्काउंटरमागेही मूसेवालाचा हात असल्याचं आम्हाला समजलं होतं. मूसेवाला हा आमच्या विरोधात काम करत होता.

Lawrence Bishnoi
धक्कादायक! सिद्धू मूसेवालाच्या शरीरावर 24 गोळ्यांच्या जखमा अन् कवटीत आढळली एक गोळी

अकाली दलाचा तरुण नेता विक्रमजितसिंह ऊर्फ विकी मिड्डुखेरा याची मागील वर्षी 7 ऑगस्टला हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात सिद्धूचा मॅनेजर शगुनप्रीतसिंग याचे नाव आले होते. त्याने कौशल गँगला सुपारी देऊन ही हत्या केल्याची चर्चा सुरू होती. यानंतर तो ऑस्ट्रेलियाला पळून गेला. या हत्येचा सूड उगवण्यासाठी सिद्धूची हत्या करण्यात आली. हा प्रकार दोन गँगमधील वादातून झाला आहे. यामागे लॉरेन्स बिष्णोई गँग असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Lawrence Bishnoi
नक्वी, अकबर, इस्लाम यांना डच्चू! राज्यसभेत आता भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाडीतून जात असताना दोन गाड्यातून हल्लेखोर त्याचा पाठलाग करीत होते. जवाहरके गावात त्यांनी सिद्धूच्या गाडीवर गोळीबर केला. यात तो जागीच ठार झाला. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्षातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी रशियन बनावटीच्या एएन-94 रायफलींचा वापर केला. सिद्धू याच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्या किमान तीन रायफलींमधून झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा करूनच तेथून पलायन केलं. सिद्धूबरोबर असलेले दोन जण जखमी असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com