Goa Assembly : गोवा विधानसभेत ST ला मिळणार आरक्षण; संसदेत लवकरच निर्णय?

Goa Political News : गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण देण्याचा आग्रह धरला जात आहे.
Goa Assembly
Goa AssemblySarkarnama
Published on
Updated on

Goa News : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी कोणतेही आरक्षण नाही. हा मुद्दा गेल्या काही काळापासून गोव्यात चांगलाच चर्चिला गेला आहे. गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना आरक्षण देण्याबाबत जोरदार मागणी केली जात आहे.

आता याबाबतचे विधेयक संसदेमध्ये लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात हे विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी मांडण्यात येईल, अशी माहिती आहे.

गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण देण्याचा आग्रह धरला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून 'रिऍडजेस्टमेंट ऑफ रीप्रेझेंटेटीव्ह ऑफ शेड्युल ट्राईब्स बिल' संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. Goa News

कायदा मंत्रालयाकडून सादर केल्या जाणाऱ्या या विधेयकामुळे जनगणना आयुक्तांना अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येची माहिती द्यावी लागेल. याच्या आधारे 'लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना आदेश 2008' मध्ये निवडणूक आयोग सुधारणा करेल.

Goa Assembly
Bachchu Kadu Vs Ravi Rana : चंद्रकांतदादांसमोरच बच्चू कडू - रवी राणा भिडले! काय आहे कारण?

कायदा मंत्रालयाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एकूण 40 संख्याबळ असलेल्या गोवा विधानसभेतील अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांची संख्या अनुसूचित जातीच्या लोकांपेक्षा जास्त आहे.

विधानसभेत अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार गोवा राज्याची लोकसंख्या 14.58 लाख इतकी आहे. यात 25 हजार 449 अनुसूचित जाती तर 1 लाख 49 हजार 275 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

Goa Assembly
Chandrakant Patil : निवडणूक कधी होणार? चंद्रकांत पाटील यांनी आचारसंहितेची तारीख सांगितली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com