Amravati Political News : अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. आमदार राणा यांनी बंद असलेल्या फिनले मिलचा विषय छेडल्याने कडू चांगलेच संतापले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासमोरच कडू आणि राणा हे नेते भिडले.
बैठकीनंतर कडू यांनीही बडनेरा मतदारसंघातील मिलवरून राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच बंद मिलचा विषय पुढे आल्याने अमरावतीतील राजकारण तापणार आहे.
अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले मिलवरून आमदार बच्चू कडू Bacchu Kadu आणि आमदार रवी राणा यांच्यातील श्रेयवाद उफाळून आला आहे. जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या अचलपूर येथील फिरने मिल गेल्या कित्त्येक वर्षांपासून बंद होती. ती सुरू करण्यासाठी सरकारने मंजूरी दिली. ही मिल सुरू करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतल्याचा उल्लेख करत राणा यांनी कडू यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केले. त्यावरून आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांचे आभार मानत राणा यांनी कडू यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यावर आमदार कडू यांनी, सहा महिन्यांपूर्वीच याला मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले. मात्र आमदार राणा हे काही आरोप करण्याचे थांबले नाहीत. यानंतर राणा आणि कडू यांच्यात चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच भर बैठकीत मोठी खडाजंगी झाली.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू यांनी राणा यांच्यावरही मिलवरून आरोप केले. त्यांच्या मतदारसंघातील विजय मिल आणि अमरावती स्विनिंग या दोन मिल बंद आहेत. तेथील कामगार उपशी आहेत. त्यांना ना घर मिळाले आणि जागा मिळाली. राणा परिवारातील एक आमदार आणि खासदार होते. असे असतानाही ते एकही मिल सुरू शकले नाहीत, याकडे बच्चू कडू यांनी लक्ष वेधले.
खासदार असताना नववीत राणा Navneet Rana यांनी मिल सुरू करण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यांचे सरकार होते. आता खापर माझ्यावर फोडले जात आहे. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. काँग्रेसच्या काळात मिल सुरू झाल्या त्या भाजपच्या काळात बंद पडल्या, याची दुःख वाटले पाहिजे. तुमच्या काळात मिल कशी बंद पडली, याची लाज वाटली पाहिजे. चार वर्षे झाले मिल बंद आहे. उलट केंद्र सरकारकडून ती बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यावर ते काहीही करू शकले नाहीत, असा टोलाही कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.