भाजपला चोवीस तासात दुसरा झटका; मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आमदारही देणार सोडचिठ्ठी

मंत्र्यांवर सेक्स स्कँडलचे आरोप झाल्यानंतर बुधवारी रात्री राजीनामा दिला आहे.
Alina Saldanha

Alina Saldanha

Sarkarnama

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून आमदारांनीही निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पण या धामधुमीत भाजपला चोवीस तास दोन मोठे धक्के बसले आहेत.

गोव्याचे (Goa) नगर विकास मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी बुधवारी रात्री उशिरा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर गुरुवारी अलीना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अलीना यांनी त्यांच्या पती मथानी सलडान्हा यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

<div class="paragraphs"><p>Alina Saldanha</p></div>
अखेर गंभीर आरोपांनंतर भाजपच्या नेत्याचा मंत्रिपदाचा राजीनामा

राजीनामा देताना सलडान्हा म्हणाल्या की, भाजपमध्ये दिवंगत मथानी सलडान्हा हे आले होते. त्यांच्या निधनानंतर त्या जागेवर मी राजकारणात प्रवेश केला होता. पण आता भाजप हा पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. आपल्या सर्व तत्वांना पक्ष विसरला असल्यासारखे वाटते, असे सलडान्हा म्हणाल्या. सलडान्हा यांनी अद्याप भाजपला सोडचिठ्ठी दिली नसली तरी त्या याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन प्रसिध्द करत नाईक यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट केलं आहे. नाईक यांनी मुक्त आणि कोणत्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी, यासाठी राजीनामा दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. कार्यालयाने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

नाईक हे दक्षिण गोव्यातील मोरमुगावो मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळात नगर विकास हे महत्वाचे खाते होते. दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parikar) यांच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी नाईक यांच्यावर सेक्स स्कँडलचे आरोप केले होते. मंत्रिपदाचा गैरवापर करून ते महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com