Sanjay Singh : 'आप'चे संजय सिंह पुन्हा अडचणीत; आता तब्बल 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला!

AAP Sanjay Singh : जाणून घ्या, नेमकं काय आहे एवढं गंभीर प्रकरण? गोव्याशी आहे आहे संबंध.
MP Sanjay Singh
MP Sanjay SinghSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: गोव्यातील नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आरोप करणारे आप नेते राज्यसभा खासदार संजय सिंह अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी त्यांच्या विरोधात तब्बल 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. भाजपच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

सरकारी नोकरीच्या नावाखाली गोमंतकीयांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावर आप नेते संजय सिंह यांनी गोवा भाजप(BJP) सरकारवर टीका केली होती. याप्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह, मंत्री व आमदारांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला होता. गेली 10 वर्षे गोवा भाजप जनतेला नोकरीचे आमिष दाखवून फसवत असल्याची टीका संजय सिंह यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली होती.

गोव्यातून देखील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आरोप केले होते. मुख्यमंत्री सावंत (CM Sawant) यांनी याप्रकरणात पत्नीचे नाव घेणाऱ्यांवर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता याप्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्याविरोधात पहिला अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला. डिचोली कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

MP Sanjay Singh
Mahayuti Government : धक्कातंत्र अंगलट; प्रचंड बहुमत, तरीही महायुती सरकार घामाघूम

'कॅश फॉर जॉब' प्रकरणात पूजा नाईक, दीपश्री सावंत गावस यांच्यासह जवळपास 30 ते 35 जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेरत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. सध्या ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, पोलिसांकडून प्रकरणाची सर्व माहिती ईडी(ED)चे अधिकारी घेत आहेत.

MP Sanjay Singh
North Pune District Politics : उत्तर पुणे जिल्हा मंत्रिपदाविना यंदा पोरका; मोहिते, बेनके यांना होती संधी, मात्र...

नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर देखील आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी पत्नीचे नाव विनाकारण घेतले जात असून, आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार खासदार संजय सिंह यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले संजय सिंह आता सुलक्षणा सावंत यांनी दाखल केलेल्या खटल्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com