Congress : गोव्यात BJP चे 'ऑपरेशन लोटस', 'भारत जोडो यात्रे'त काँग्रेसला खिंडार

goa congress : विधानसभा निवडणुकीला 5 महिने झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda
Narendra Modi, Amit Shah, J.P. Naddasarkarnama

पणजी : महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्तातर झाले. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन केली. आता भाजपचे पुढचे टार्गेच गोवा (goa )असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोव्यात काँग्रेसला (goa congress)मोठं खिंडार पडणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

'भारत जोडो यात्रे'मध्ये व्यस्त असलेल्या काँग्रेसला गोव्यात मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज (बुधवारी) पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व आमदारांनी विधानसभेत पोहोचून वेगळे होत असल्याचे पत्र सभापती रमेश तावडकर यांना दिले. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी सांगितले की, सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda
BJP : साधूंच्या मारहाणीवरुन राजकारण पेटलं ; पालघरची आठवण करुन भाजपने केला आघाडी सरकारचा निषेध

विधानसभा निवडणुकीला 5 महिने झाले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी 2019 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिया लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, अलेक्सो स्कायरिया, संकल्प अमोलकर आणि रोडॉल्फो फर्नांडिस यांची नावे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये आहेत.

गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 असून सध्या काँग्रेसकडे 11 आणि भाजपचे 20 आमदार आहेत. जुलै 2019 मध्ये काँग्रेसचे 10 आमदार एकत्र भाजपमध्ये दाखल झाले होते. काही महिन्यांपूर्वी गोवा काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com