गोव्यानेच माझ्या पंतप्रधानपदाचा पाय रचला : पर्रिकरांची आठवण काढत मोदींची साद

गोवा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उतरल्याने चुरस वाढली..
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

म्हापसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गोवा निवडणुकीच्या प्रचारात जान फुंकली. काॅंग्रेसवर जोरदार प्रहार करत त्यांनी भाजपच पुन्हा गोव्यात प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा विश्वास व्यक्त केला. म्हापसा येथे झालेल्या सभेत त्यांनी आपल्या गोव्याशी निगडीत वैयक्तिक आठवणी देखील सांगितल्या.

मी आज जे आहे त्याची सुरवात गोव्यातूनच झाल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने सांगितली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माझे सहकारी मनोहर पर्रीकर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भाजपच्या जून 2013 मध्ये झालेल्या गोव्यातील बैठकीतच मला 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार समितीचा प्रमुख म्हणून पर्रीकर यांनी घोषित केले होते. त्यानंतर मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. त्या वेळी पर्रीकर यांनी गोव्यात सभाही आयोजित केली होती. त्या सभेत मी सहजपणे एक वाक्य बोलून गेलो. ते वाक्य होते काॅंग्रेसमुक्त भारत. आता हे वाक्य कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, अशा शब्दांत त्यांनी स्मरण केले.

गोव्याची संस्कृती ही वेगळी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. ज्यांना गोव्याच्या संस्कृतीची माहिती नव्हती. त्यांनी गोव्याला भ्रष्टाचाराचे एटीएम बनविले होते. मात्र भाजपने स्वयंपूर्ण गोव्याचा मंत्र दिला होता. गोव्यात काॅंग्रेसचे सरकार असताना 25 लाख पर्यटक दरवर्षी येत होते. ही संख्या भाजपच्या काळात 90 लाखांवर गेली. गोव्यातील अनेक प्रमुख प्रकल्पांना भाजप सरकारने गती दिली, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोरोनाच्या संकटाने गेली दोन वर्षे आपल्याला जखडून ठेवले आहे. मात्र भाजपचे सरकार नसते तर कोरोनावरील लस आपण शोधू शकलो असतो का? 150 कोटी लशींचे उत्पादन आपण करू शकलो असतो का? 100 टक्के लसीकरण झालेले गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले. भाजपचे सरकार नसते तर हे झाले असते का, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला. मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही तोंडभरून कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com