Goa Election result: प्रमोद सावंत 140 मतांनी आघाडीवर, शिवसेनेला गोयेंकरांनी नाकारले

विधानसभेच्या (Goa Assembly Election) सर्व 40 ही जागांची मतमोजणी आज गुरुवारी निकास लागणार असून 301 उमेदवारांचे पुढील 5 वर्षांचे भवितव्य ठरणार आहे.
Pramod sawant
Pramod sawant

पणजी : गोव्यात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीच्या अखेरपर्यंत भाजप आघाडीवर आहे. तर अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर 2647 मतांनी पिछाडी आणि भाजपचे बाबुश मोन्सरात 2981 मतांनी आघाडीवर आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीत १४० मतांनी आघाडीवर आहेत.

तर हळदोण्यात काँग्रेसचे कार्लुस फेरेरा ८३ जागांवर आहेत. कळंगुटमध्ये मायकल लोबो, म्हापशात जोशुआ डिसोझा, साळगावात जयेश साळगावकर ११० मतांनी पुढे आहेत मयेत प्रेमेंद्र शेट, सांतआंद्रेत फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रूजमध्ये टोनी फर्नांडिस पुढे आहेत.

Pramod sawant
राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर; शिवसेना तळात

गोव्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी विधानसभेच्या 40 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. आज यातील सर्व जागांचे प्रारंभिक कल समोर आले आहेत. विधानसभेच्या (Goa Assembly Election) सर्व 40 ही जागांची मतमोजणी आज गुरुवारी निकास लागणार असून 301 उमेदवारांचे पुढील 5 वर्षांचे भवितव्य ठरणार आहे.

सुरुवातीच्या हाती आलेल्या ट्रेंडनुसार मतमोजणीच्या पहिल्या फेरीत, भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे, तर मगोप 2 जागांवर, आप 1 जागेवर आणि अपक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. पर्वरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार रोहन खवंटे आघाडीवर आहेत, तर नीलेश काब्राल कुडचडे मतदारसंघात आघाडीवर आहेत.

पण गोव्यात राज्यात झालेल्या मतमोजणीत शिवसेना कुठेही दिसत नसल्याने, गोव्यात शिवसेनेचा फ्लॉप शो झाल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहेत. भाजप 8 मतदारसंघात आघाडीवर, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी दोन जागी तर आप आणि मगो प्रत्येकी एका जागी आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com