शिवसेनेचे आमदार परत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन नेते घुसले... पण बेड्यांत अडकले

शिंदे गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली होती.
Sonia Duhan, Shreya Kothial
Sonia Duhan, Shreya Kothialsarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोर आमदारांचा गट शनिवारी रात्री मुंबईत पोहोचला. मात्र, याआधी हा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून तिघांना अटक करण्यात आली होती. हे तिघेही हरयाणा आणि उत्तराखंड राज्यातील असल्याचे सांगितले जात होते. त्यांच्याकडे फेक आयडीकार्ड सापडले होते. पोलिसांनी (Police) तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.

शिवसेनेचे (ShivSena) बंडखोर आमदार राहत असलेल्या हॉटेलमध्ये बोगस ओळखपत्राद्वारे प्रवेश करून राहणाऱ्या या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सोनिया दोहान (Sonia Duhan) (30) आणि त्यांचा सहकारी श्रेया कोठीयाल (26) असल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलमधून अटक केलेल्यांची खरी ओळख आता पटली आहे. बनावट नावे सांगून त्यांनी हॅाटेलच्या रूमनंबर 625 मध्ये वास्तव्य केले होते.

Sonia Duhan, Shreya Kothial
ठाकरे म्हणाले, "फडणवीसांना ऐकलं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षांपूर्वी दिसली असती !

आमदारांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी सोनिया दोहान येथे आल्या असल्याची चर्चा आहे. कलम 419, 420 अंतर्गत बोगस ओळखपत्र देणे आणि भलत्याच व्यक्तीच्या नावे हॉटेलमध्ये राहणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकार स्थाप केले होते.

Sonia Duhan, Shreya Kothial
सत्ता गेली; पण जयंत पाटलांचा तोरा अजूनही कायम : पडळकरांनी साधला निशाणा

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना वेगळ्या राज्यात हॅाटेलमध्ये ठेवले होते. त्या आमदारांची हॅाटेलमधुन सुटका करण्यासाठी सोनिया दोहान यांची प्रमुख भूमिका बजावली होती. मात्र, शिवेसना आमदारांशी संपर्क करणे त्यांना महागात पडले आहे. यावेळी मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com