Good News For AAP : कर्नाटक निवडणुकीपूर्वी 'आप'साठी 'गूड न्यूज'; न्यायालयाने दिला महत्वाचा आदेश

Election Commission : निवडणूक आयोगाच्या विलंबाला न्यायालयाचे उत्तर
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Karnataka Election and AAP : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सर्व 224 जागा लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने (आप) घेतलेला आहे. त्यानुसार पक्षाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपसाठी कर्नाटक उच्च न्यायालाने एक गूड न्यूज दिली आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चली जात आहे.

आप सर्व निकष पूर्ण करत असल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आम आदमी पक्षाला (AAP) एनसीटी-दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये निवडणूक वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राज्य पक्षाचा दर्जा आहे. तरीही 'आप'ने पक्षाला 'राष्ट्रीय पक्ष'चा दर्जा देण्यास निवडणूक आयोग विलंब करत होते. त्यामुळे पक्षाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कर्नाटक (Karnataka) युनिटचे पक्षाचे निमंत्रक पृथ्वी रेड्डी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'आप'ने याचिकेत म्हटले होते की, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटींची पूर्तता करतो, मात्र असे असतानाही पक्षाला हा दर्जा देण्यास विलंब होत आहे.

Arvind Kejriwal
Buldana News : ठाकरे गटाला मोठा धक्का; 'किंगमेकर' जालिंदर बुधवतांचा अर्ज बाद : भाजप अन् शिवसेनेची खेळी यशस्वी

याचिकेत 'आप'ने म्हटले आहे की, "6 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगाला आठवण करून दिल्यानंतरही आजपर्यंत त्याचा विचार करण्यात आलेला नाही. तर, पक्षाला एनसीटी-दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरातच्या निवडणूक वेबसाइटवर राज्य पक्षाचा दर्जा आहे. निवडणूक आयोगाकडे या समस्येचे निराकरण करण्यासाठी जवळपास तीन महिन्यांहून अधिक कालावधी होता. मात्र, निवडणूक आयोगाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याला माननीय न्यायालयाकडून दिलासा मिळणे बंधनकारक आहे."

Arvind Kejriwal
Karnataka Election : कुमारस्वामींच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी 'आप'ला राष्ट्रीय दर्जाबाबत निवडणूक आयोग 11 एप्रिल रोजी मोठा निर्णय घेऊ शकतो. कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याबाबत 13 एप्रिलपूर्वी आदेश देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधीने यासंदर्भात 11 एप्रिल रोजीच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.

Arvind Kejriwal
Karnataka Congress : 'हायकमांड' निष्ठावानास 'कष्टाचं फळ' देतील; मुख्यमंत्रीपदावरून शिवकुमारांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अटी ?

'आप'ने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या अटींबाबत निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 च्या कलम 6B चा संदर्भ दिला. कोणत्याही पक्षाला 4 वेगवेगळ्या राज्यांतील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मते मिळायला हवीत किंवा लोकसभेत किमान 4 जागा हव्यात किंवा किमान चार राज्यांमध्ये राज्य पक्षाची मान्यता मिळायला हावी. यातील नियमानुसार आप शेवटची अट पूर्ण करत आहे.

देशभरात वापरता येते चिन्ह

पुढील महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कर्नाटकातील सर्व 224 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर निवडणुकीत मदत होईल. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होत असून 13 मे रोजी निकाल लागणार आहेत. वास्तविक, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला त्याचे विशेष निवडणूक चिन्ह दिले जाते. ते देशभरातील विविध निवडणुकांसाठी वापरता येते. राष्ट्रीय पक्षाचे निवडणूक चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला देशभरात वापरता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com