Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

Onion and Potato Farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Onion Farmers
Onion FarmersSarkarnama
Published on
Updated on

Gujarat News: कांद्याचे दर कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

बटाटा उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 270 कोटी रुपयांचे पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Onion Farmers
Abdul Sattar News : शेतकऱ्यांनो चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी..

सध्या महाराष्ट्रातही काद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे गुजरात सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला का नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत निर्णय कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 70 कोटी तर बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयांचे पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली आहे.

Onion Farmers
Cotton Farmers : दिवाळीत घरी आलेला कापूस होळीतही घरातच पडून, चूक शेतकऱ्यांचीच !

दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पादरम्यान शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक घोषणा करणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com