कोश्यारी हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करताहेत ; राऊतांचा टोमणा

राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले.
bhagat singh koshyari, sanjay raut
bhagat singh koshyari, sanjay rautsarkarnama

मुंबई: विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि फोन टॅपिंगवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari)आणि भाजपवर (bjp)निशाणा साधला. राऊत माध्यमांशी बोलत होते. ''कोश्यारी हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करीत आहेत,'' अशा शब्दात संजय राऊतांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.

''मंत्रिमंडळामधील प्रमुख सदस्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखेविषयी कळवलं आहे. राज्यपालांना विधिमंडळाचं स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचं महत्त्व कळत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती घेण्यासाठी आघाडीच्या (mahavikas aghadi शिष्टमंडळाने राज्यपालांची यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यानंतरही राज्यपालांनी काहीच निर्णय न घेतल्याने राऊतांनी नाराजी व्यक्त केली.

संजय राऊत म्हणाले, ''देश धर्म रक्षणासाठी आणखी काही करता येईल. पण आता लोकशाहीच देशातली धोक्यात आली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेच काम होऊ दिलं नाही,''

राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, राज्यपालांना पदावरून हटवलं पाहिजे, असं सरकारचं म्हणणं नसून महाराष्ट्राचं म्हणणं आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत. हे या राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही,''

bhagat singh koshyari, sanjay raut
Disha Salian Case: खेळ तुम्ही सुरु केला, संपविणार आम्ही ; राणेंचा इशारा

राऊत म्हणाले, ''महाराष्ट्रात माझा आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन टॅप केला जात होता. रश्मी शुक्ला यांनी हे केलं आणि त्यांनी कुणाला दिलं हे सगळ्यांना माहीत आहे. याप्रकरणी आता कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीनंतरही काय चाललंय हे माहीत व्हावं यासाठी माझा फोन टॅप केला जात होता. गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं. फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. आणि महाराष्ट्र पॅटर्नचे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com